WhatsApp: हे एक मेसेजिंग अँप आहे ज्याचा वापर अनेक लोक मित्र आणि कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी करतात. दिवसभर लोकांच्या संपर्कात राहण्याचा हा एक मार्ग आहे आणि त्याशिवाय कार्य करणे खूप कठीण आहे. व्हॉट्सअँपवर दररोज इतके संदेशांची देवाणघेवाण होते की कोणते संभाषण सर्वात महत्त्वाचे होते हे कळणे अशक्य होईल.
आपला जोडीदार (गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, नवरा किंवा बायको) दिवसभर फोनवर व्यस्त असू शकते, परंतु आपल्याला ती अनेकदा व्हॉट्सअँपवर मित्रांसोबत चॅट करताना आढळते. काहीवेळा ती काय पाहत आहे किंवा ती कोणाशी सर्वाधिक चॅट करत आहेत हे सांगणे कठीण असते.
तर आम्ही तुम्हाला व्हॉट्सअँप मध्ये उपलब्ध असलेली एक सेटिंग सांगणार आहोत जिच्या द्वारे तुम्ही तुमचा जोडीदार सर्वात जास्त कोणासोबत चॅट करतो ते समजेल.
चला तर समजून घ्या पुढील स्टेप्स:
- सर्वात पहिले व्हाट्सअँप ओपन करा
- Settings वर क्लिक करा
- Data and Storage usage वर क्लिक करा
- आता तुम्हाला Contact लिस्ट दिसेल आणि क्रमवारीत जास्तीत जास्त खर्च झाला आहे त्यानुसार ते तुमच्यासमोर येईल. सर्वात जास्त ज्या ग्रुप किंवा व्यक्ती सोबत चॅट केले आहे ते वरच्या बाजूला राहील आणि बाकीचे त्यानुसार क्रमवारीत.
- तुम्ही त्यापैकी नावावर क्लिक करून त्यांच्यातील टेक्स्ट, स्टिकर, फ़ोटो, वीडियो यांची माहिती घेऊ शकता.
- येथून तुम्ही Storage Clear पण करू शकता आणि स्पेस वाचवू शकता.
महत्वाची गोष्ट : हे फीचर देण्यामागचे कारण म्हणजे वापरकर्ता आपल्या फोनचे स्टोरेज व्यवस्थापित करू शकतेल. पण तुम्हाला येथून सर्वाधिक चॅटींग कोणासोबत झाली हे देखील कळते.