iPhone चोरी होऊन बंद असेल तरी शोधू शकता फोनला, करा फक्त हे काम

आज आम्ही तुम्हाला तुमचा iPhone हरवला, चोरीला गेला आणि तो चोरीला गेल्यानंतर बंद झाला तरीही तुमचा फोन ट्रॅक केला जाऊ शकतो ह्याबद्दल माहिती सांगणार आहोत.

iphone Find my phone

तुमचा महागडा फोन चोरीला गेल्यास, चोर तो बंद करेल किंवा लॉक करेल जेणेकरून तुम्ही त्यात प्रवेश करू शकणार नाही. पोलिसांना कळवल्यानंतरही तुम्हाला तो परत मिळाला नाही, तर चोराने फोन बंद करून लॉक केल्यामुळे असे होऊ शकते. मात्र, फोन कुठे आहे हे शोधून तो परत मिळवण्याचा एक मार्ग आहे. कसे ते जाणून घेऊया.

तुमचा महागडा फोन चोरीला गेल्यास, चोर लगेच फोन बंद करेल किंवा लॉक करेल जेणेकरून तुम्ही तो वापरू शकणार नाही. काही वेळेस पोलिसांना कळवल्यानंतरही चोर पकडू न शकल्याने फोन परत भेट नाही.

पण जर तुमच्या बाबतीत असे घडले तर अजूनही आशा आहे. बंद आणि लॉक केलेला स्मार्टफोन कसा ट्रॅक करायचा ते आम्ही तुम्हाला सांगू शकतो जेणेकरून तुम्ही तो शोधू शकाल.

पुढची प्रकारे तुम्ही तुमचा हरवलेला स्मार्टफोन परत मिळवू शकता

  • चोरी गेलेला फोन ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला काही खास गोष्टीची काळजी ठेवावी लागेल.
  • सर्व प्रथम iPhone एअरप्लेन मोड वर ठेवा म्हणजे फोन नेटवर्क डिस्कनेक्ट होईल.
  • त्यानंतर Setting मध्ये जा आणि Control Panel आणि USB Setting App Setting बंद करा.
  • त्यानंतर Find my iPhone या option मध्ये जा.
  • तेथे Find my Network आणि Send Last Location हे option क्लिक करा. हे केल्याने फोन मधील Emmergency पर्याय सक्रिय होईल आणि त्यामुळे हरवलेल्या आयफोनचे अचूक स्थान शोधता येईल.
  • तुमचा फोन ऑफ किंवा लॉक असेल तरी तो ट्रॅक करता येऊ शकतो.

टीप : वरील सांगितली गेलेली माहिती फक्त iPhone साठी आहे. जर तुम्ही Android फोन असेल तर तुम्हाला Google चे Find My Phone हे फिचर चालू करावे लागेल. Google Play Store वर अशी अनेक Apps आहेत ज्यांच्या मदतीने हरवलेला फोन ट्रॅक करता येऊ शकतो.

हे पण वाचा : Afforable 5G Smartphones : किंमत फक्त 10999 रुपयांपासून सुरू होते, Redmi, Poco, Samsung यांचे फोन उपलब्ध

Follow us on

Sharing Is Caring: