Best Mileage Bike: आज आम्ही तुमच्यासाठी अशा एक बाईकची माहिती घेऊन आलो आहे, जिची टाकी फुल भरल्यानंतर 900KM पर्यंत जाऊ शकते. आम्ही जिच्या विषयी बोलत आहे तिचे नाव आहे, “बजाज CT100” (Bajaj CT100 Mileage).
सध्या पेट्रोलचे भाव इतके वाढले आहेत कि, प्रत्येक जण बाईक घेताना मायलेज किती मिळेल या गोष्टीचा विचार करतो त्यामुळे बहुतेक जण “Best Mileage Bike” शोधत असतात. कारण कमी पैशात कसे जास्त अंतर जात येईल किंवा, किती बाईक चालवता येईल हा त्या मागचा हेतू असतो.
हल्ली प्रत्येकजण प्रवासाच्या सोईसाठी बाईकचा विचार करतो, पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तिकडे सहज बाईकने प्रवास करणे सोईचे असल्याने मायलेज बाईकला पसंती मिळते कारण त्या आपल्या खिशाला परतवडतात.
Bajaj CT100 Mileage:
बजाज Best Mileage Bike जास्त देत असल्याने त्या भारतीय बाजरात खूप लोकप्रिय आहेत. Bajaj CT100 Mileage हि बाईक 70Kmpl ते 90Kmpl पर्यंत मायलेज देते. बाईकच्या टाकीत 10 लिटिर पेट्रोल बसू शकते. एकदा बाईकची टाकी फुल करण्यासाठी अंदाजे 1060 रुपये पर्यंत खर्च येईल आणि त्यानंतर तुम्ही 900KM पर्यंतचा प्रवास सहज करू शकाल.
हे पण वाचा: Electric Scooter Avera Retrosa चा टॉप स्पीड 90 kmph आणि रेंज 140 km आहे, जाणून घ्या किंमत आणि इतर फीचर्स
Bajaj CT100 Price:
बजाज कंपनीने त्यांच्या “Bajaj CT100” या मॉडेलची विक्री बंद केली आहे. हि बाईक साधारण 53000 हजार रुपयांपर्यंत मिळत होते. आता हि बाईक घेण्याचा विचार असेल तर ती सहज सेकंड हँड मार्केटमध्ये मिळू शकते. सेकंड हँड गाड्यांची विक्री करणाऱ्या अनेक वेबसाईट आहे त्यावर ह्या बाईक साधारण 40,000 रुपयांना विकली जात आहे.
Bajaj CT100 Features:
बाईक मध्ये 102cc सिंगल सिलेंडर इंजिन असून 7.9 PS आणि 8.3 Nm आउटपुट देते. बाईकचे वजन फक्त 108 किलो असून ब्लॅक विथ ब्लू, ब्लॅक विथ रेड आणि फ्लेम रेड हे 3 रंग मिळू शकतात. Bajaj CT100 ची स्पर्धा हि TVS स्टार सिटी प्लस आणि Hero HF Deluxe या बाईक सोबत होते. बाईक मध्ये तुम्हाला हॅलोजन लाइट्स, फुल बॉडी ग्राफिक्स, सिंगल-पीस सीट, अलॉय व्हील आणि कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टम (CBS) हे फीचर्स मिळू शकतील.