Alert! तुमची फक्त हि एक चूक आणि तुमचा फोन होईल हॅक, WhatsApp मध्ये हि “सेटिंग” तुम्ही पण ऑन ठेवता का? जरूर वाचा

WhatsApp मध्ये अशा कोणत्या सेटिंग आहे ज्याचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात आणि तुमच्या फोनचा कंट्रोल घेऊ शकतात त्या कोणत्या सेटिंग आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. शिवाय त्यापासून तुम्ही कसे वाचाल हे तुम्हाला ह्या लेखात समजणार आहे.

आताच्या काळात बहुतेक सर्वांकडे स्मार्टफोन आहे आणि त्यामध्ये WhatsApp देखील आहे पण त्यामध्ये असणाऱ्या काही सेटिंग्स जर ऑन राहिल्या तर त्याचा फायदा हॅकर्स घेऊन तुमच्या फोनमध्ये एंट्री करू शकतात. त्यामुळे कोणत्या त्या सेटिंग आहेत त्या माहित करून घ्या आणि हॅकर्स पासून वाचा.

WhatsApp

हॅकर्स लोकांना फसवण्यासाठी दररोज काहींना काही नवीन पद्धती शोधून काढतात. आता त्यांनी एका नवीन पद्धतीचा वापर करायला सुरुवात केली आहे. ती पद्धत GIF इमोजी बाबतीत आहे. हॅकर्स फिशिंग लिंक GIF इमोजी सोबत जोडून फोनमध्ये घुसखोरी करत आहे.

बहुतेक लोकांच्या व्हाट्सअँप च्या सेटिंग्स मध्ये बऱ्याच सेटिंग ऑन ठेवलेल्या असतात. लोक एकमेकांचे बघून गरज नसताना देखील त्या ऑन ठेवतात किंवा चुकून ऑन राहतात आणि त्याचाच फायदा हॅकर्स घेऊन फोन मध्ये एंट्री करतात. तुम्ही देखील व्हाट्सअँप ची हि सेटिंग ऑन ठेवली असेल तर हॅकर्स पासून तुम्हाला देखील धोका होऊ शकतो.

हॅकर्स GIF इमेजने फिशिंग अटॅक इंप्लांट करण्याच्या पद्धतीला GIFShell असे म्हणतात. युजर्सच्या फक्त या चुकीमुळे नकळत हॅकर्स व्हाट्सअँप आणि फोनचा कंट्रोल मिळवू शकतात.

कोणती आहे ती Whatsapp सेटिंग ?

हल्ली बहुतेक लोक Whatsapp सेटिंग मध्ये Media Auto Download हे फीचर ऑन ठेवतात आणि ह्याच सेटिंग चा फायदा हॅकर्स घेतात. जर हि सेटिंग ऑन ठेवली असेल तर कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून येणारे व्हिडिओ, फोटो, फाईल्स आणि GIF ऑटोमॅटिक डाउनलोड होतील, त्यामुळे सर्वात आधी हि सेटिंग ऑफ करा आणि पुढील धोका टाळा.

हे पण वाचा : YouTube Shorts सहज डाउनलोड करून ठेवू शकाल WhatsApp स्टेटस वर, कसे ते जाणून घ्या

Whatsapp Media Auto Download असे करा बंद :

जर तुम्हाला ती सेटिंग ऑफ कशी करायची ते माहित नसेल तर चिंता करू नका. आम्ही तुम्हाला सांगतो. प्रथम Whatsapp सेटिंग मध्ये जा, त्यानंतर Storage And Data हे ऑप्शन दिसेल, त्यावर क्लीक करा. त्यानंतर तुम्हाला “Media Auto-Download” म्हणून ऑप्शन दिसेल. तेथे “When using mobile data” हे ऑप्शन त्यामध्ये Photos, Audio, Videos, Documents हे ऑप्शन दिसतील त्यापैकी एक हि ऑप्शन निवडू नका म्हणजे “Media Auto-Download” हि सेटिंग ऑफ होईल.

हि सेटिंग ऑफ केल्याने संभाव्य हेकेर्सच्या एंट्रीचा धोका तुम्ही टाळू शकता, ह्या बाबत एका हिंदी वेबसाईटने वृत्त दिले आहे.

Follow us on