शनी उदय होणार; वृषभ, कन्या आणि ३ राशींच्या लोकांच्या जीवनात येतील अडचणी राहावे लागेल सावधान

वृषभ, कन्या राशीसह या 5 राशींना लाभ होण्याच्या ऐवजी नुकसान होऊ शकते. चला तर माहिती करून घेऊया शनी उदय झाल्याने कोणत्या राशींना जीवनात अडचणी येऊ शकतात.

Effect of Shani Uday on zodiac signs: शनिवार, ५ मार्च रोजी शनी ग्रहाचा कुंभ राशीत अस्त होणार आहे. 30 जानेवारी पासून कुंभ राशीत शनिदेव कमजोर स्थितीत आहेत. शनी उदय काही राशींच्या लोकांसाठी शुभ फळ घेऊन येईल, परंतु शनीच्या सोबतच सूर्य आणि बुध ग्रह देखील कुंभ राशीत असतील. अशा स्थितीत काही राशींवर शनीचा अशुभ प्रभाव राहील. अशा स्थितीत शनीच्या वक्री होण्याने वृषभ, कन्या राशीसह या 5 राशींना लाभ होण्याच्या ऐवजी नुकसान होऊ शकते. चला तर माहिती करून घेऊया शनी उदय झाल्याने कोणत्या राशींना जीवनात अडचणी येऊ शकतात.

शनी उदय Effect of Shani Uday on zodiac signs
शनी उदय Effect of Shani Uday on zodiac signs

वृषभ :

शनी उदय वृषभ राशीच्या लोकांसाठी मध्यम फलदायी असणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी नोकरदार लोकांना अधिकाऱ्यांमुळे काही समस्यांना तोंड द्यावे जावे लागू शकते, ज्यामुळे मानसिक तणाव निर्माण राहील. ह्या काळात कोणती हि गुंतवणुक करणे अनुकूल होणार नाही आणि कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. काही गोष्टींवरून वडिलांसोबत मतभेद होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही अस्वस्थ राहू शकता. तुमच्यात आत्मविश्वासाच्या अभावामुळे कामाच्या ठिकाणी कामे पूर्ण करण्यात अडचण येऊ शकते.

कन्या :

कन्या राशीच्या लोकांना शनी उदय मुळे जीवनात चढ-उतारांचा सामना करावा लागेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, पण सहकाऱ्यांमुळे काही अडचणी निर्माण होऊ शकतात. ह्या काळात तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, तसेच कोणा सोबत हि बोलताना शब्द जपून वापरा, नाही तर वादाची परिस्थिती निर्माण होईल. ह्या काळात कसले हि नियोजन करू नका, काही काळासाठी ते पुढे टाळा. आपल्या दैनंदिन जीवनात संतुलन राखून काम करा नाही तर आरोग्य वर त्याचा परिणाम होईल.

गुरु आणि चंद्राने निर्माण केला नवपंचम राजयोग, या 3 राशींचे भाग्य उजळू शकते, करिअर आणि व्यवसायात यश

वृश्चिक :

शनी उदय वृश्चिक राशीच्या लोकांसाठी संमिश्र फलदायी राहणार आहे. या काळात पालकांचे सहकार्य राहील, परंतु जवळच्या व्यक्तीमुळे सरकारी कामात अडचणी येऊ शकतात. भाग्याची साथ नसल्याने कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागेल. तसेच भावा भावांमध्ये कोणत्याही गोष्टी वरून मतभेद निर्माण होतील. तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध राहा आणि शब्द जपून वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.

मकर :

शनी तुमच्या राशीच्या दुसऱ्या घरात राहील. व्यावसायिक जीवनात अडचणी आल्याने कुटुंबात अशांतता राहील. तुमच्या आईचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे योग्य काळजी घ्या. भांडांशी मालमत्ते वरून वाद होऊ शकतात. त्यामुळे डोकं शांत ठेवा आणि बोलताना शब्दांवर अंकुश ठेवा. ह्या काळात बाहेरचे खाणे टाळा आणि तर आजारी होऊ शकता.

मीन :

तुमच्या राशीपासून शनि बाराव्या भावात राहील. लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवनात या काळात  गैरसमज निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जोडीदारासोबत संवाद चालू ठेवा आणि समजूतदारपणा दाखवा. कोणताही मोठा निर्णय या काळात घेणे टाळावे. जे लोक भाडीदारीत व्यवसाय करत त्यांना समस्या येऊ शकतात, ज्याचा व्यापारावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. घरातील गोष्टींसाठी पैसे खर्च होऊ शकतात, त्यामुळे आवश्यक खर्च कोणता ते ठरवून बजट बनवावे लागेल. ह्या काळात मनात कोणत्या तरी गोष्टीसाठी चिंता निर्माण होईल.

Follow us on

Sharing Is Caring: