या अभिनेत्री अगोदर असलं काम करत पण आता आहेत प्रसिद्ध तारका

टीवी आणि चित्रपट स्टार सोबतच एअर होस्टेस आणि फ्लाइट अटेंडंटची नोकरी देखील खूप ग्लैमरस मानली जाते कारण येथे काम करण्यासाठी सुंदरता आणि चांगली शरीरयष्टी आवश्यक आहे. चित्रपट आणि मॉडेलिंगच्या जगातील अनेक ओळखीचे चेहरे एअरलाइन्सच्या जगातून आले आणि त्यांनी चित्रपटांमध्ये आपले नाव कमावले पण आज आम्ही तुम्हाला सीरियलच्या जगातील कलाकारांची नावे सांगणार आहोत जे अगोदर एअरहोस्टस आणि एटेंडन्स चे काम करत होते.

सुदीप साहिर : भगवान श्रीकृष्ण यांच्या भूमिके मधून प्रसिद्धी मिळवलेला एक्टर सुदीप साहिर जवळपास 17 वर्षे झाली अभिनय क्षेत्रात आहे. पण त्याआधी तो एक फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करत होता.

आमिर अली : आमिर अलीने आपल्या करियर ची सुरुवात एक केबिन क्रू म्हणून केली होती. जवळपासर पाच वर्षे त्यांनी एयरलाइन्स कंपनीत काम केले. त्यानंतर तो चित्रपटांमध्ये काम करू लागला. आता टीव्हीच्या जगात आमिर एक सुप्रसिद्ध नाव आहे.

नंदिनी सिंह :  ‘केसर’ आणि ‘काव्यांजली’ यासारख्या प्रसिद्ध मालिका मध्ये काम केलेली नंदिनी सिंह ही देखील एक एअर होस्टेस होती. एक्टिंगसाठी तिने एअरलाइन्सची नोकरी सोडली होती. पण आता नंदिनीने अभिनय देखील सोडला आहे.

दीपिका कक्कड़ : एक ही एअर होस्टेस होती जी ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत सिमर भारद्वाजची भूमिका साकारून प्रसिद्ध झाली होती. मुंबई विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर दीपिकाने एअर होस्टेस म्हणून जेट एअरवेजमध्ये नोकरी केली होती.

आकांक्षा पुरी : विघ्नहर्ता गणेशा मध्ये देवी पार्वतीची भूमिका साकारणारी आकांक्षा पुरी ही विजय मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्समध्ये एयर होस्टेसची नोकरी करत होती. त्यानंतर ती एक मॉडेल झाली आणि नंतर मधुर भांडारकर यांच्या फिल्म कॅलेंडर गर्ल मधून तिने फिल्म इंडस्ट्री मध्ये प्रवेश केला.

Follow us on

Sharing Is Caring: