Flat: जेव्हा पण आपण फ्लॅट खरेदी करतो तेव्हा बिल्डर किंवा प्रॉपर्टी डीलर कार्पेट एरिया, बिल्ट-अप आपणि सुपर बिल्ट-अप एरिया ह्या बद्दल नक्कीच माहिती सांगतो. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टींचा अर्थ माहीत असणे जरुरी आहे. बहुतेक लोकांना ह्या शब्दांमधील फरकच माहीत नसतो आणि ह्याच गोष्टीचा फायदा बिल्डर्स किंवा प्रॉपर्टी डीलर घेतो. अशाने तुमच्यासोबत धोकेबाजी होण्याची शक्यता वाढते. खरतर कोणत्याही फ्लॅटची किंमत स्क्वायर फूट मध्ये ठरवली जाते. त्यामुळे ग्राहकांना माहिती असले पाहिजे कि, कोणत्या जागेसाठी ते किती पैसे देत आहे. येथे समजून घ्या कि, कार्पेट, बिल्ट-अप आणि सुपर बिल्ट-अप एरिया बद्दल अधिक माहिती.
बिल्ट-अप एरिया (Built Up Area)
चला तर समजून घेऊ या बिल्ट-अप एरिया काय असते. एक प्रकारे तुमच्या पूर्ण घराचे क्षेत्रफळ म्हणजेच एरिया असतो. ह्यामध्ये रूम, भिंत आणि सोबतच बाल्कनी इत्यादीचा समावेश असतो. एकूणच बिल्ट-अप एरिया म्हणजे त्या जागेच्या वापरण्यायोग्य (कार्पेट एरिया) जागे सोबत, भिंती, आणि बाल्कनीची जागा अशी मिळून बिल्टअप एरिया तयार होतो.
जर तुमचा प्रॉपर्टी खरेदीचा विचार असाल तर, या 4 गोष्टी लक्षात ठेवा नाही तर करत राहाल पश्चाताप
सुपर बिल्ट-अप एरिया (Super Built Up Area)
सुपर बिल्ट-अप एरिया म्हणजे अशी जागा कि, जेथे पर्यंत खरेदीदारचा कब्जा असेल. म्हणजे बघायला गेले तर अशी जागा जी खरेदी करण्यासाठी तुम्ही पैसे देत आहे. तुमच्या रजिस्ट्रीमध्ये सुपर एरियाला तुमच्या मालकी हक्का प्रमाणे नमूद केले जाईल. म्हणजेच तुम्ही तेवढ्या क्षेत्रफळाच्या जागेचे मालिक बनले आहे. ह्यामध्ये पार्क, जिम, जेनरेटर रूम, जिना, लिफ्ट, टेनिस कोर्ट इत्यादी सुपर बिल्ट-अप एरियाचा भाग असतो.
कार्पेट एरिया (Carpet Area)
कार्पेट एरिया म्हणजे फ्लॅट बांधून झाल्या नंतर फ्लॅट मध्ये वापरण्यासाठी मिळणाऱ्या मोकळ्या जागेला कार्पेट एरिया म्हटले जाते. जर तुम्ही अंडर-कंस्ट्रक्शन घर (Under Construction Home) बुक केले आणि बुकिंग करताना तर तुम्हाला सांगितलेला कार्पेट एरिया बांधकाम झाल्या नंतर कमी असेल तर तुम्हाला रिफंड देखील मिळू शकतो. साधारण पणे कार्पेट एरिया हा बिल्ट अप एरियाच्या 70 टक्के असतो.
लिविंग डायनिंग रूम, बेडरूम, बाथरूम, स्टडी रूम आणि किचन इत्यादी कार्पेट एरिया मध्येच बनवले जाते. ह्याला नेट यूजेबल एरिया असे पण बोलले जाते. भिंतीची जाडी, बाल्कनी, टेरेस इत्यादींचा ह्यामध्ये समाविष्ट केले जात नाही. पण टेरेस वर जाण्यासाठी घराच्या आतून पायऱ्या बनवल्या असतील तर त्यांना कार्पेट एरिया समाविष्ट केले जाते.