Buy Property Safely: घर, जमीन खरेदी किंवा विक्री करणे एक दीर्घकाळाची गुंतवणूक आहे, कारण अशी काम दर वर्षी होत नाही. ह्यामध्ये एकदा पैसे लावले जातात आणि त्यासाठीच बहुतेक सर्वच जण असा विचार करतात कि, अशी कोणती प्रॉपर्टी घ्यावी ज्यामध्ये पैसे अडकू नये.
कित्येकदा लोक चुकीने अशी प्रॉपर्टी खरेदी करतात जिच्यामुळे त्यांना त्रास होतो. हे महत्वाचे कारण आहे कि घर, जमीन, शेत ह्याप्रकारची प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या पहिले काही गोष्टीची विशेष काळजी घेतील गेली पाहिजे.
प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या पहिले तुम्हाला काही गोष्टी तपासून घेतल्या पाहिजे जसे कि सर्वात पहिले प्रॉपर्टी वर कोणाचा स्थायी कब्जा आहे. दुसरे असे कि, प्रॉपर्टी संदर्भात काही विवाद किंवा डिस्प्युट तर नाही आहे. तिसरे घर किंवा जमीन कोणाच्या नावा वर आहे. चौथी गोष्ट, प्रॉपर्टीचे कागदपत्र तपासावेत. प्रॉपर्टी खरेदी करताना ह्या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे.
प्रॉपर्टी वर स्थायी कब्जा:
तुम्ही खरेदी करत असलेल्या प्रॉपर्टीचे पक्के रजिस्ट्रेशन असले पाहिजे. त्या प्रॉपर्टी किंवा घरावर त्याच व्यक्तीचा कब्जा असला पाहिजे ज्याच्या कडून तुम्ही ती खरेदी करत आहे. जर समजा तसे नसेल तर तुम्ही ती प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करू नका.
प्रॉपर्टी वर कोणता हि विवाद नसावा:
समजा कि, तुम्ही खरेदी करण्याऱ्या घर किंवा जमिनी बद्दल पहिलेच काही विवाद चालू नसावा. जसे कि, बहुतेक वेळेस कौटुंबिक जुनी प्रॉपर्टी असेल तर भाऊ, काका किंवा इतर नातेवाईक ह्यांच्यामध्ये काही कोर्ट केस चालू असते. कित्येकदा अशा प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन होते पण कधीकधी लोकांकडे जमिनीचा तुकडा असतो, परंतु त्यात काही समस्या असतात. तुम्ही ती जमीन विकत घेतल्यास, तुम्हाला तेथे कोणत्याही समस्यांशिवाय राहता येणार नाही. उदाहरणार्थ, तुमच्या आधी ज्यांच्या मालकीचे होते त्यांना ते परत हवे असल्यास, तुम्हाला ते सोडावे लागेल. तुम्ही जमीन खरेदी करण्यापूर्वी सर्वकाही ठीक आहे याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.
जमीन किंवा घर ज्यांच्या नावा वर आहे त्यांच्या कडून प्रॉपर्टी घ्या:
प्रॉपर्टीचे व्यवहार त्याच व्यक्ती सोबत करा ज्याच्या नाव वर घर किंवा जमीन असेल. समजा कि, प्रॉपर्टी वडिलांच्या नावे आहे पण, तिला मुलगा विकत आहे तर असा व्यवहार करू नका. अशा ने तुम्ही अडचणीत येऊ शकता.
प्रॉपर्टीचे कागदपत्र तपासावेत:
जी व्यक्ती प्रॉपर्टी विकत आहे तिच्या कडे पॉवर ऑफ अटॉर्नी किंवा रजिस्ट्री असावी. जर समजा त्या व्यक्तीला पॉवर ऑफ अटॉर्नी आहे पण तिला ती प्रॉपर्टी विकण्याचा अधिकार आहे का ते तपासून घ्या. प्रॉपर्टीचे व्यवहार करताना अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन जरूर घ्यावे.