Tata Motors ग्राहकांसाठी वाईट खबर, नवीन वर्षात या इलेक्ट्रिक कारची किंमत वाढणार

Tata Tiago EV Price Hike: आजच्या या माहिती मधून तुम्हाला समजेल कि, Tata Motors च्या Tata Tiago EV कारच्या किंमती किती आणि का वाढल्या ते समजेल.   

tata motors tiago ev

Tata Motors ने गेल्या महिन्याच्या अखेरीस नवीन Tiago EV लाँच  केली. सुरुवातीला इलेक्ट्रिक हॅचबॅक 8.49 लाख रुपयाला लॉन्च केली होती. तिच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 11.49 लाख रुपय होती. आता कंपनी Tiago EV ची किंमत 3 ते 4 टक्क्यांनी वाढवण्याच्या विचारात आहे, त्यामुळे इलेक्ट्रिक हॅचबॅक कारची किंमत 30,000 ते 35,000 रुपयांपर्यंत वाढू शकते.

Tata Motors ने लॉन्च करतानाच घोषणा केली होती कि, प्रास्ताविक किंमती हि, सुरुवातीच्या दहा हजार ग्राहकांसाठीच लागू होतील. खरेदीदारांकडून इलेक्ट्रिक हॅचबॅकला मोठा प्रतिसाद मिळत आहे. कंपनीला 1 महिन्यापेक्षा कमी काळात 20,000 हुन अधिक बुकिंग मिळाल्या आहेत. Tiago EV च्या पहिल्या 20,000 खरेदीदारांसाठी प्रास्ताविक किंमती वाढवण्यात आल्या आहे.

कंपनीचे असे म्हणणे आहे कि, किंमतीतील वाढ बॅटरीच्या किंमतींमध्ये 30 ते 35 टक्के वाढ झाल्यामुळे देखील करण्यात करण्यात येत आहे.

Tata Tiago EV कार 19.2kWh आणि 24kWh या दोन बॅटरी पॅकच्या पर्याय सोबत उपलब्ध आहे. इलेक्ट्रिक हॅचबॅकची मोटार 24kWh बॅटरीसह 74bhp आणि 114Nm जनरेट करते, तसेच 19.2kWh बॅटरीसह 61bhp आणि 110Nm देते. लहान बॅटरीचे मॉडेल 0 ते 60 किमी प्रतितास 6.2 सेकंदात वेग वाढवू शकते, 24kWh बॅटरीचे मॉडेल 5.7 सेकंदात तेच काम करू शकते. एंट्री-लेव्हल मॉडेलची रेंज 250km आहे आणि मोठ्या बॅटरी पॅकची रेंज 315km आहे.

हे पण वाचा : Tata Motors ने वाढवले Maruti Brezza चे टेन्शन, बनवली आहे नवीन रणनीती

Follow us on

Sharing Is Caring: