Ola Electric : ग्राहकांसाठी मोठी खुशखबर! 31 डिसेंबर पर्यंत मिळत आहे “या” स्कुटर वर भरघोस सूट

Ola Electric Big Discount Offers : ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तीन राइडिंग मोड आहेत: नॉर्मल, इको आणि स्पोर्ट्स. हे इको मोडवर 125 किलोमीटर, नॉर्मल मोडवर 100 किलोमीटर आणि स्पोर्ट्स मोडवर 90 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकता.

Ola Electric sctooters
Ola Electric sctooters

Ola Electric Discount Offers : आजच्या घडीला Ola हि दुचाकी क्षेत्रात देशातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपनी आहे. देशभरात अनेक ठिकाणी ओलाच्या इलेक्ट्रिक स्कुटर्स वापरल्या जात आहे. चालू वर्ष 2022 संपण्यासाठी काही दिवसच बाकी आहेत, त्याच वेळी कंपनीने नवीन ग्राहकांना आपल्या स्कुटर्सकडे आकर्षित करण्यासाठी ओला इलेक्ट्रिकने डिस्काउंट ऑफर जाहीर केली आहे.

कंपनी आपल्या ग्राहकांना S1 Pro वर 10,000 रुपयांचे डिस्काउंट तर S1 वर 4,000 चे अतिरिक्त कॅशबॅक आणि 2,000 कॅशबॅक देत आहे. ग्राहकांसाठी हि ऑफर 31 डिसेंबर 2022 पर्यंत उपलब्ध राहणार आहे.

ऑफर 31 डिसेंबर 2022 पर्यंत

सध्या S1 Pro ची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे 1,25,000 रुपये आणि S1 ची एक्स-शोरूम किंमत 97,999 रुपये आहे.

कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरवर 10,000 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केले आहे. तसेच 4 हजार रूपयांची कॅशबॅक ऑफरसुद्धा दिली आहे. तुम्ही हि स्कुटर झिरो डाउन पेमेंट वर EMI द्वारे खरेदी करू शकता हि ऑफर सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेतच उपलब्ध राहील.

Move OS 3 लवकरच उपलब्ध होणार

कंपनी लवकरच आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी नवीन अपडेट जारी करत आहे. हे अपडेट हिल होल्ड, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग लेव्हल आणि साउंडट्रॅक यासारखी वैशिष्ट्ये जोडेल.

Ola S One Pro 

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बॅटरी पॅक आहे ज्यामुळे ती 181 किलोमीटरची रेंज देऊ शकते. ते ताशी 116 किलोमीटर वेगाने जाऊ शकते. ते केवळ 3 सेकंदात 40 किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठू शकते.

वैशिष्ट्ये काय आहेत?

ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तुम्हाला सवारी करणे सोपे करण्यासाठी वेगवेगळे राइडिंग मोड आहेत. इको मोडची रेंज 125 किलोमीटर, नॉर्मल मोडची रेंज 100 किलोमीटर आणि स्पोर्ट्स मोडची रेंज 90 किलोमीटर आहे. तसेच, ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक नवीन फीचर्स उपलब्ध आहेत.

TVS iCube शी स्पर्धा करणार

Ola S मध्ये एक मोटर आहे जी 3 kW पॉवर आणि 140 Nm पीक टॉर्क निर्माण करते. ती 78 किमी/ताशी वेगाने जाऊ शकते.

हे पण वाचा : Tata Motors ग्राहकांसाठी वाईट खबर, नवीन वर्षात या इलेक्ट्रिक कारची किंमत वाढणार

Follow us on

Sharing Is Caring: