Download Aadhaar Card : तुम्ही आता Whatsapp वरून देखील डाउनलोड करू शकता, कसे ते वाचा

Download Aadhaar Card : भारत सरकारचे MyGov Helpdesk हे ई-गव्हर्नन्स पोर्टल आहे. त्यावरून अनेक प्रकारच्या सेवांचा लाभ तुम्ही घेऊ शकता.

Download Aadhaar Card

सध्याच्या काळात प्रत्येकाकडेच स्मार्ट मोबाईल आहे आणि त्यात व्हॉट्सअप. व्हॉट्सअप हे लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग App आहे, जगभरात त्याचे अनेक वापरतकर्ते आहेत.

सध्या भारतीय रेल्वेमध्ये ऑनलाईन तिकीट बुक करण्यापासून ते खाण्यापिण्या पर्यंत सर्व गोष्टींसाठी लोक Whatsapp चा वापर करत आहेत. त्याचा अधिकाधिक वापर होत असल्याने भारत सरकारने नागरिकांना Whatsapp वर अधिक सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारी कागदपत्र डाउनलोड करण्यासाठी आता Whatsapp चा वापर करता येणार आहे. भारत सरकारनुसार आता तुम्ही तुमचे आधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅन कार्ड (Pan Card) तुमच्या WhatsApp वरूनच डाउनलोड करू शकता.

MyGov Helpdesk हे भारत सरकारचे ई-गव्हर्नन्स पोर्टल असून त्यावरून अनेक प्रकारच्या सेवांचा लाभ घेऊ शकता. डिजीलॉकरच्या मदतीने तुम्हाला Pan Card आणि Aadhar Card सहज डाउनलोड करता येईल. सरकारद्वारे लोकांना लोकांना डिजीलॉकरच्या विविध सेवा देण्यासाठी WhatsApp चॅटबॉट सुरु करण्यात आला आहे.

Download Aadhaar Card :

तुमचे Aadhaar Card डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमचे Aadhaar Card आणि पॅन कार्ड माहिती डिजिलॉकरवर (Digilocker) सेव्ह करून ठेवावी लागेल आणि सरकारच्या या WhatsApp चॅटबॉटद्वारे डाउनलोड करू शकाल.

DigiLocker मध्ये लॉग इन करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या Android किंवा iOS डिव्हाइसवर अँप डाउनलोड करणे आवश्यक आहे. तुम्ही अँप डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला तुमची Aadhar Card आणि पॅन सेवा DigiLocker शी लिंक करावी लागेल. त्यानंतर, लॉग इन करण्यासाठी तुमचा नंबर वापरा.

WhatsApp द्वारे Aadhar Card आणि Pan Card डाऊनलोड करण्यासाठी काही स्टेप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत.

  1. तुमच्या स्मार्टफोन मध्ये 91-9013151515 MyGov हेल्पडेस्क क्रमांक संपर्क म्हणून सेव्ह करा.
  2. तुमच्या मोबाइल फोनवर WhatsApp उघडा आणि MyGov HelpDesk चॅटबॉट शोधा व उघडा त्यानंतर Hi टाइप करा.
  3. त्यानंतर चॅट मध्ये तुम्हाला “CO-WIN सेवा” किंवा “डिजिलॉकर सेवा” असे दोन पर्याय दिसतील त्यापैकी डिजिलॉकर सेवांवर टॅप करा.
  4. तुमच्याकडे सक्रिय DigiLocker नसेल, तरीही तुम्ही नंबर निवडून सेवा वापरू शकता. ते तुम्हाला तुमच्या DigiLocker खात्याशी कनेक्ट करण्यास सांगेल आणि तुमचा 12-अंकी आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून तुमची ओळख सत्यापित करा. तुमचा आधार क्रमांक एंटर करणे नेहमीच आवश्यक असते, तुमच्याकडे सक्रिय डिजिलॉकर असला तरीही.
  5. तुम्ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत फोन नंबरवर एक OTP मिळेल. तुम्ही ते चॅटबॉटशी चॅट करण्यासाठी वापरू शकता.
  6. तुम्ही चॅटिंग पूर्ण केल्यानंतर, तुमच्या डिजिलॉकर खात्यावरील कागदपत्रांची सूची दर्शविली जाईल. यापैकी कोणतेही दस्तऐवज डाउनलोड करण्यासाठी, फक्त दस्तऐवज क्रमांक टाइप करा आणि पाठवा.
  7. चॅट बॉक्स तुम्हाला डाउनलोड केलेल्या डॉक्युमेंटची PDF दाखवेल.

हे पण वाचा : YouTube Shorts सहज डाउनलोड करून ठेवू शकाल WhatsApp स्टेटस वर, कसे ते जाणून घ्या

Follow us on

Sharing Is Caring: