Jio देणार टक्कर Facebook-Instagram ला; VIDEO Creators ची होईल बम्पर कमाई!

जर तुम्ही Facebook, Instagram मध्ये 10 सेकंदाचे Video बनवत असाल तर तुमच्यासाठी हि खूप आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे. कारण Jio कंपनी देणार आहे Video Creators लोकांना बम्पर कमाई करण्याची सुवर्ण संधी.

सध्या इंस्टाग्राम आणि फेसबुक मध्ये 10 सेकंदाचे विडिओ बनवून लोक बरेच पैसे कमवत आहेत. किती तरी लोकांनी त्यांना पूर्ण वेळ प्रोफेशनल म्हणून निवडले आहे. ह्याच गोष्टीचा फायदा घेण्याचा Jio कंपनीने निर्णय घेतला आहे. कंपनीचे लक्ष आहे कि, त्यांच्या युजर्सना उत्तम अनुभव देण्यासोबतच क्रिएटिव्ह असलेल्या लोकांना कमाई करण्याची संधी प्रदान करणे.

Jio Facebook Instagram

Jio कंपनी स्वतःचा ‘Platform’ या नावाचा शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म लॉन्च करून Meta कंपनीच्या Reels फीचरला टक्कर  देणार आहे. Rolling Stone India आणि Creativeland Asia सोबत जिओ कंपनीने पार्टनरशिप केली आहे. ज्याप्रकारे फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या Reels हे अ‍ॅप काम करते त्याधरती वर जिओ चे अ‍ॅप काम करणार आहे.

Instagram Facebook Reels प्रमाणेच काम करेल 

ज्या प्रकारे अ‍ॅक्टर्स, कॉमेडियन्स, डान्सर्स, फॅशन डिझायनर्स, सिंगर्स, म्यूझिशियन्स इत्यादी प्रकारचे लोक Video बनवतात आणि Instagram Facebook Reels मध्ये अपलोड करून आपली कला दाखवतात आणि पैसे देखील कमावतात, त्याप्रमाणे Jio Platforms ऑरगॅनिक ग्रोथ आणि स्टेडी – मॉनिटायझेशनसाठी स्टार एंटरटेनर्सना फायदा देणार आहे.

जिओ कंपनीने Jio Platforms च्या इंटरफेसची किंवा इतर डिटेल्सची माहिती प्रसारित केली नाही. मात्र Meta कंपनी प्रमाणेच युजर्सना उत्तम ग्रोथ आणि मॉनिटायझेशन ऑप्शन देण्याचा त्यांचा प्लॅन आहे.

कधी होणार लॉन्च?

Jio Short Video Platform चे बीटा व्हर्जन उपलब्ध आहे आणि जानेवारी 2023 मध्ये स्टेबल व्हर्जन लॉन्च केला जाईल. तथापि, यावेळी, साइन इन करणे शक्य नाही. सुरुवातीला, केवळ 100 संस्थापक सदस्य प्लॅटफॉर्म वापरण्यास सक्षम असतील. या सदस्यांच्या प्रोफाईलवर गोल्ड टिक व्हेरिफिकेशन असेल. नवीन सदस्य जोडण्यासाठी विनंत्या पाठवणारे वापरकर्ते रेफरल प्रोग्रामसह लॉग इन करू शकतात. जिओने म्हटले आहे की ते अधिक निर्मात्यांसाठी प्लॅटफॉर्म उघडल्यानंतर ते नवीन वैशिष्ट्ये देतील.

रँक आणि प्रतिष्ठा मिळवून निर्माते या अ‍ॅपद्वारे अधिक पैसे कमवू शकतात. त्यांच्या प्रोफाइलवर “Book Now” बटण प्रदर्शित केले जाईल, जे वापरकर्ते, चाहते आणि ब्रँडना कलाकारांशी संपर्क साधण्याची परवानगी देईल. अशा प्रकारे, भागीदारी तयार केली जाऊ शकते आणि इतर विविध गोष्टींची व्यवस्था केली जाऊ शकते.

हे पण वाचा : Jio Offer New Year 2023 : जिओचा जबरदस्त प्लॅन, दररोज मिळेल 2GB data, किंमत बघून आश्चर्य वाटेल

Follow us on

Sharing Is Caring: