Mahindra Thar: भारतीय बाजरात महिंद्रा थार हि ऑफ-रोड राइडिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. कंपनी ह्या मॉडेलचे उत्पादन वाढवत असून हिचे सर्वात कमी किंमतीचे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. पूर्वी मिळणारे 13.59 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीचे जे मॉडेल होते ते आता 9.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमत कसे मिळणार ते पाहायचे आहे.
Mahindra Thar 2WD: जर तुम्ही देखील महिंद्रा थार या SUV चे फॅन आहे आणि हि गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी काही बातमी एक खुशखबर घेऊन आली आहे. Mahindra Thar कंपनीच्या सर्वात कमी किंमतीचे जे मॉडेल आहे त्याच्या एक्स-शोरूम ची किंमत 13.59 रुपये होती, त्याची किंमत कमी होऊन आता 9.99 रुपये झाली आहे. म्हणजेच तुमचे 3.6 लाख रुपये वाचणार आहे. भारतीय रस्त्यावर राज्य करणारी शानदार ऑफ-रोड SUV आता 10 लाख रुपयात कशी मिळणार, तिची किंमत का म्हणून कमी झाली तर त्याचे कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
आता पर्यंत विकली जाणारी महिंद्रा थार 4×4 पॉवरट्रेन होती. परंतु कंपनीने आता थार लाइनअपमध्ये 2WD पॉवरट्रेन जोडली आहे. पॉवरट्रेन बदली झाल्यामुळे नवीन थारची किंमत कमी झाली आहे. कंपनीने 2WD पॉवरट्रेनसह थारचे कमी किंमतीचे मॉडेल लॉन्च केले आहे, ज्याची किंमत पूर्वीच्या थार पेक्षा कमी आहे. 2WD किंवा 4×4 पॉवरट्रेन बदली झाल्याने त्याचा किंमतीवर कसा परिणाम होतो ते तुम्हाला पुढे समजेल.
Mahindra Thar 2WD vs 4×4
2WD पॉवरट्रेन म्हणजे इंजिन कारच्या पुढील आणि मागील दोन्ही चाकांना उर्जा पाठवते. जेव्हा गाडी वळते तेव्हा इतर दोन चाके एकाच वेळी वळतात. नवीन महिंद्रा थारच्या बाबतीत, इंजिन पॉवर मागील दोन्ही चाकांना रिअर व्हील ड्राइव्ह (RWD) प्रणाली अंतर्गत पाठविली जाते. यापूर्वी, थारला 4×4 पॉवरट्रेनची ऑफर दिली जात होती. यामध्ये इंजिनची शक्ती गाडीच्या चारही चाकांपर्यंत पोहोचते. यामुळे थारला फिरण्यासाठी भरपूर शक्ती मिळते.
Mahindra Thar 2WD: इंजन
कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांसाठी महिंद्राने थार 2WD प्रकारात थार लाँच केली आहे. या नवीन मॉडेलची एक्स-शोरूम किंमत रु. 9.99 लाखांपासून सुरू होते. हे नवीन मॉडेल 4×4 व्हेरियंट सारखेच आहे, फक्त इंजिन मध्ये बदल आहे. 2WD प्रकारात 1.5 लिटर CRDe डिझेल इंजिनची शक्ती मिळेल. तसेच ह्या मॉडेलचा आकार 4 मीटरपेक्षा कमी असल्याने त्यावर कमी कर लागत आहे.
2WD आणि महिंद्रा थार
- 2WD म्हणजेच टू-व्हील ड्राइव्ह हे 4×4 फोर-व्हील ड्राइव मॉडेलच्या तुलनेत स्वस्त आहे.
- 2WD सिस्टम मॉडेलला कमी पॉवर लागणार आहे, त्यामुळे इंधन देखील कमी लागेल.
- 4×4 च्या तुलनेत 2WD गाडी हलकी असून कमी पॉवर देते. त्यामुळे महिंद्रा थार 2WD ऑफ-रोड एक्सपीरिएंस देत नाही.
- 2WD इंजनच्या गाड्या सर्व प्रकारच्या रस्त्यांसाठी नसते.
हे पण वाचा : BYD: या इलेक्ट्रिक कार समोर टेस्लाची कार पण फेल! सिंगल चार्ज मध्ये 700km ची रेंज; भारतात लॉन्च होणार पुढील 8 दिवसांत