BYD: या इलेक्ट्रिक कार समोर टेस्लाची कार पण फेल! सिंगल चार्ज मध्ये 700km ची रेंज; भारतात लॉन्च होणार पुढील 8 दिवसांत 

13 जानेवारी पासून सुरु होणाऱ्या ऑटो एक्सपो 2023 मध्ये चिनी कंपनी BYD (Build Your Dreams) मोठा धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहे. कंपनीने भारतीय बाजारात यापूर्वीच आपल्या काही इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत.

आता कंपनी काही नवीन मॉडेल्स घेऊन येणार आहे, या मध्ये BYD सील (Seal) सेडानचाही समावेश असेल. पहिल्यांदाच हि कार सर्वांसमोर सादर होणार आहे. सध्या हि कार भारता शिवाय काहीच देशात लॉन्च झाली आहे. युरोप आणि चीनमध्ये ह्या कारचा सामना थेट टेस्ला मॉडेल-3 सोबत होत आहे. या कारचे डिझाईन ओशनने प्रेरित आहे. कंपनीचा असा दावा आहे कि, सिंगल चार्जवर हिची रेंज 700km पर्यंत आहे.

BYD Car

BYD सीलचे बॅटरी पॅक आणि रेंज:

ब्लेड बॅटरी टेक्नोलॉजीचा वापर BYD ने आपल्या नवीन इलेक्ट्रिक सेडान सीलमध्ये केला आहे. या  कार मध्ये पहिले इंजिन 61.4kWh युनिट आणि दुसरे इंजिन 82.5kWh युनिट पॅक अशा दोन बॅटरी पॅक सह येत आहे. अनुक्रमे 550km आणि 700km पर्यंत कारची रेंज असेल. याशिवाय 110kW ते 150kW पर्यंतचे बॅटरी ऑप्शन कार सोबत देऊ शकते. तसेच ड्युअल मोटर सेटअप देण्यात आला आहे. हि कार फक्त 3.8 सेकंदामध्ये 0-100kmphची स्पीड घेऊ शकते असे कंपनीचे म्हणणे आहे.

BYD सीलचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशंस:

सेंटर कंसोलमध्ये रोटेटिंग सह 15.6-इंचांचा इंफोटेनमेंट डिस्प्ले येतो. ड्रायव्हर सीटला हेड-अप डिस्प्ले आणि 10.25-इंचाचा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर मिळेल. फ्लोटिंग टचस्क्रीनच्या दोन्ही बाजूला दोन एसी व्हेंट्स आहेत, ज्यामध्ये ड्राईव्ह सिलेक्टर आणि तळाशी स्क्रोल व्हील आहे. तुम्ही वेगवेगळे ड्राइव्ह मोड निवडू शकता. सेंटर कन्सोलमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत, जसे की हिटेड विंडशील्ड आणि ऑडिओ सिस्टमसाठी व्हॉल्यूम कंट्रोल, दोन वायरलेस चार्जिंग पॅड हे ऍडव्हान्स फीचर्स मिळू शकतील.

या कारमध्ये कूपसारखे सर्व-काचेचे छप्पर, फ्लश डोअर हँडल, चार बूमरॅंग-आकाराचे एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, स्प्लिट हेडलॅम्प डिझाइन आणि मागील बाजूस एक पूर्ण रुंद एलईडी लाइट बार आहे. यामध्ये इतर गाड्यांप्रमाणेच अनेक फिचर्स आहेत, मात्र या कारच्या किंमतीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याची किंमत सुमारे 60 लाख रुपये असल्याचे मानले जाते.

हे पण वाचा : Tata Motors ग्राहकांसाठी वाईट खबर, नवीन वर्षात या इलेक्ट्रिक कारची किंमत वाढणार

Follow us on

Sharing Is Caring: