Rooftop Solar: 25 वर्ष लाईट बिल येईल झिरो; बस्स एकदा लावा घरा वरती हे सोलर पैनल

Rooftop Solar Scheme: जर तुम्ही पण घराच्या लाईट बिलामुळे चिंतेत असला तर चिंता नका करू त्यावर उपाय आहे तो म्हणजे सोलर पॅनल. तुम्हाला तुमच्या घरा वर सोलर पॅनल लावण्यासाठी सरकार सबसिडी देखील देत आहे. हि सरकारची सबसिडी कशी मिळवायची ते देखील आम्ही सांगणार आहे.   

Rooftop Solar Panel : सध्या सर्वच गोष्टींचे भाव गगनाला भिडले आहेत त्यामुळे महागाईची झळ सर्वाना बसत आहे. त्यामुळे बचत कशी करावी हा प्रश्न पडतो. नेहम कोणता खर्च कमी करावा आणि कसा ह्यावर घराघरात चर्चा होत असते. त्यातच एक मुद्दा असतो तो घराचे वाढलेले लाईट बिल. तुम्हाला लाईट बिलाचे टेन्शन घेण्याची गरज नाही कारण आता तुम्ही घराच्या छतावर सोलर पॅनेल बसून फॅन, कुलर, एसी, टीव्ही, फ्रिज इत्यादी उपकरण वापरू शकता आणि पुढील 25 वर्षे त्यासाठी पैसे देण्याची पण गरज नाही. पण त्यासाठी तुमचा एकदा मोठा खर्च होईल पण त्यासाठी देखील सरकार तुम्हाला सबसिडी देणार आहे.  

Rooftop Solar Panel

छतावर Rooftop Solar बसवण्यावर सरकार सबसिडी देत आहे, पण त्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम फक्त एक काम करावे कि, तुम्ही त्या सबसिडीसाठी पात्र आहात का ? आणि ते पाहण्यासाठी तुमच्या वीज कंपनीशी संपर्क साधा.

तुमच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकार अनुदान देत आहे. हे अनुदान नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या रूफटॉप योजनेद्वारे उपलब्ध आहे. या सबसिडीचा लाभ घेण्यासाठी आधी तुमचा वीज वापर तपासा.

2-3 पंखे, एक फ्रीज, 6-8 एलईडी दिवे, एक पाण्याची मोटर आणि एक टीव्ही अशी उपकरणे चालवल्यास दररोज 6-8 युनिट वीज खर्च होऊ शकते आणि त्यासाठी तुम्हाला 2 किलोवॅट क्षमतेचे सौर पॅनेलची आवश्यकता आहे.

Rooftop Solar साठी सरकार किती सबसिडी देते ?

नॅशनल रूफटॉप पोर्टल सौर पॅनेल क्षमतेच्या प्रति किलोवॅटसाठी 14,588 रुपये सबसिडी प्रदान करते. ग्राहक त्यांच्या क्षेत्रातील कोणत्याही नोंदणीकृत वितरण कंपनीकडून रुटॉप सौर पॅनेल स्थापित करू शकतात. 40 टक्के अनुदान 3 किलोवॅटपर्यंतच्या सौर पॅनेलच्या स्थापनेसाठी उपलब्ध आहे. त्याच वेळी, 10 किलोवॅट क्षमतेसाठी 20 टक्क्यांपर्यंत सबसिडी उपलब्ध असेल.

Rooftop Solar साठी अर्ज कसा करावा

सोलर रूफटॉप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

स्टेप 1

 • Sandes नावाचे App डाउनलोड करा आणि त्यानंतर “सोलर रूफ टॉप डॉट गोव्ह डॉट इन” या पोर्टलवर नोंदणी करा.
 • राज्य निवडा
 • इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्यूशन कंपनी / वीज वितरण कंपनी इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्यूशन कंपनी (DISCOM) निवडा.
 • वीज ग्राहक क्रमांक प्रविष्ट करा.
 • कृपया मोबाईल नंबर टाका.
 • ईमेल आयडी टाका.
 • आता पोर्टलच्या निर्देशांखालील स्टेप्स फॉलो करा.

स्टेप 2

 •  ग्राहक क्रमांक आणि मोबाइल क्रमांकासह लॉग इन करा.
 • फॉर्म अंतर्गत रूफटॉप सोलरसाठी अर्ज करा.

स्टेप 3

 • DISCOM च्या मंजुरीची प्रतीक्षा करा. मंजूरी मिळाल्यानंतर, DISCOM कडे नोंदणीकृत कोणत्याही विक्रेत्याकडून सौर संयंत्रे बसवता येतील.

स्टेप 4

 • सौर पॅनेल स्थापित केल्यानंतर प्लांट तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा.

स्टेप 5

 • नेट मीटर बसवल्यानंतर, DISCOM द्वारे तपासणी केली जाईल. यानंतर, ते पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र जारी करेल.

स्टेप 6

 • कमिशनिंग अहवाल प्राप्त झाल्यानंतर, पोर्टलवर बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करा. 30 दिवसांच्या आत सबसिडीचे पैसे तुमच्या बँक खात्यात येतील.

हे पण वाचा : EPFO Alert: ही महत्त्वाची माहिती 6 कोटींहून अधिक लोकांसाठी आहे, अजिबात करू नका हे काम.

Follow us on

Sharing Is Caring: