Daily Horoscope in Marathi, Today 31 March 2023: ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) ३१ मार्च २०२३, शुक्रवार आहे. कोणत्या राशींसाठी राहील भाग्यशाली, कोणाला होणार आर्थिक लाभ, कोणत्या लोकांनी घ्यावी काळजी, हे जाणून घेण्यासाठी वाचा १२ राशीचे आजचे राशिभविष्य पुढील प्रमाणे.
मेष (Aries):
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान असणार आहे. तुम्ही तुमचे ध्येय साध्य कराल. तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले दिसत आहात. तुमची सर्व कामे इतरांपेक्षा चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जर तुम्ही आधी एखाद्याला पैसे दिले असतील तर ते परत केले जातील.
वृषभ (Taurus):
आज तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी चांगल्या संधी मिळू शकतात, ज्याचा फायदा घ्यावा. नोकरीच्या क्षेत्रात चांगली कामगिरी कराल. पदोन्नतीसह पगारवाढीसारखी चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबात सुख-शांती राहील.
मिथुन (Gemini):
आजचा दिवस तुमचा सर्वोत्तम दिवस असेल. तुमचे एखादे काम खूप दिवसांपासून अडकले असेल तर ते पूर्ण होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जीवनातील त्रास कमी होतील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल.
कर्क (Cancer):
आज तुमचा दिवस आनंदाने भरलेला असेल. काही लोक तुमच्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला अशा लोकांपासून दूर राहावे लागेल. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा तेव्हाच निर्णय घ्या गुंतवणूकीचा. नोकरीच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील.
सिंह (Leo):
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. तुमच्या कामात यश मिळेल. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुम्ही तुमची वेगळी ओळख निर्माण करू शकाल.
कन्या (Virgo):
आज तुम्हाला काही नवीन लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळू शकते. कार्यालयीन कामे वेळेवर पूर्ण कराल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. जो व्यक्ती नोकरीच्या शोधात होते त्यांना आज चांगली संधी मिळू शकते. तुमची कोणतीही अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
तूळ (Libra):
आज तुमचा दिवस पूर्वीपेक्षा चांगला जाईल. जीवनातील समस्या दूर होतील. आज कोणाशीही बोलताना बोलण्यावर संयम ठेवा. छोट्या व्यापाऱ्यांच्या ग्राहकांमध्ये वाढ होणार आहे. काही महत्त्वाच्या कामासाठी केलेला प्रवास आनंदायी आणि फलदायी असेल.
वृश्चिक (Scorpio):
आज करिअरमध्ये काही मोठे यश मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. पालकांच्या मदतीने तुमची काही अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात. कुटुंबातील सर्व सदस्यांशी उत्तम समन्वय राहील. ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी दिवस फायदेशीर ठरेल.
धनु (Sagittarius):
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. तुम्ही भागीदारीत कोणतेही काम करत असाल तर आज तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना लवकरच मोठे पद मिळण्याची शक्यता आहे. अचानक मोठी रक्कम मिळेल, ज्यामुळे घराची आर्थिक स्थिती सुधारेल.
50 वर्षांनंतर या 4 राशींच्या संक्रमणाने दुर्मिळ नीच राजयोग घडला, नशीब चमकेल, अमाप संपत्तीचा योग
मकर (Capricorn):
आज कौटुंबिक समस्यांपासून सुटका मिळेल. जर तुम्हाला मोठी गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस त्यासाठी खूप चांगला आहे. तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. तुम्हाला आयुष्यात अनेक चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ (Aquarius):
आज तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले दिसत आहात. तुमच्यात नेतृत्व करण्याची क्षमता असेल. राजकारणाच्या क्षेत्राशी निगडित लोकांचा मान-सन्मान वाढेल. अचानक मोठा पैसा मिळण्याची शक्यता आहे. आज कोणालाही कर्ज देऊ नका, अन्यथा उधारलेले पैसे परत मिळणे कठीण होईल.
मीन (Pisces):
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास असेल. व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेऊ शकता. त्याचा सल्ला तुम्हाला खूप उपयोगी पडेल. संगणक ऑपरेटरला कंपनीकडून भरपूर काम मिळू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.