Daily Horoscope in Marathi, Today 03 March 2023: ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) ०२ मार्च २०२३, शुक्रवार असून आजचा दिवस कोणत्या राशींसाठी राहील भाग्यशाली, कोणाला होणार आर्थिक लाभ, कोणत्या लोकांनी घ्यावी काळजी, हे जाणून घेण्यासाठी वाचा १२ राशीचे आजचे राशिभविष्य पुढील प्रमाणे.
मेष (Aries):
आज तुमची कार्यक्षत्रात चढ-उताराची स्थिती राहील. तुमच्या व्यवसायात कोणताही बदल करू नका, अन्यथा नफा कमी होऊ शकतो. काही लोक तुमच्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे सावध राहा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
वृषभ (Taurus):
आजचा दिवस तुमचा सर्वोत्तम दिवस असेल. सुख-समृद्धीमध्ये वाढ होईल. कुटुंबात सुरू असलेल्या अडचणी दूर होतील. एखाद्या मोठ्या कंपनीकडून मुलाखतीसाठी कॉल येण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांनी छोट्या फायद्याची संधी वाया जाऊ देऊ नये, अन्यथा समस्या उद्भवू शकतात.
मिथुन (Gemini):
आज तुमचा दिवस अनुकूल परिणाम घेऊन आला आहे. नोकरीच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल. पदोन्नतीसह पगार वाढीची चांगली बातमी मिळू शकते. आज तुमची कोणतीही अपूर्ण इच्छा पूर्ण होईल. मानसिक चिंता दूर होईल.
कर्क (Cancer):
आज तुमचा दिवस खूप कठीण दिसत आहे. अति उधळपट्टी होईल, जे तुमच्या चिंतेचे कारण असेल. तुम्हाला तुमच्या उत्पन्नानुसार घरखर्चाचे बजेट बनवण्याचा सल्ला दिला जातो, ते तुमच्यासाठी अधिक चांगले होईल. आर्थिक व्यवहारात सावध राहावे लागेल.
सिंह (Leo):
आजचा दिवस तुमचा खास दिवस आहे. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. जर तुम्ही यापूर्वी एखाद्याला पैसे दिले असतील तर ते परत केले जातील. नोकरीत काम करणाऱ्या लोकांनी नीट ऐकून घेऊनच काम करावे लागेल.
कन्या (Virgo):
आज तुमचा दिवस अत्यंत फलदायी असेल. कोर्टाशी संबंधित कोणतेही प्रकरण चालू असेल तर निकाल तुमच्या बाजूने येईल. आज पैसे उधार देऊ नका कारण नुकसान होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला भागीदारीत नवीन काम सुरू करायचे असेल तर जरूर विचार करा.
तूळ (Libra):
तुम्ही मोठ्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल आणि कोणतेही नवीन काम सुरू करणे तुमच्यासाठी चांगले राहील. भावंडांशी सुरू असलेले मतभेद संपतील. खाजगी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती मिळू शकते. यासोबतच पगारवाढीची चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक (Scorpio):
आज तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या चांगल्या विचारांचा तुम्हाला फायदा होईल. अनोळखी व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. पती-पत्नी एकमेकांच्या भावना समजून घेतील. वाहन सुख मिळेल. तुम्हाला तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवावा.
धनु (Sagittarius):
आज तुमचा दिवस आनंदाने भरलेला दिसतो. भागीदारीत काही नवीन काम करायचे असेल तर आजचा दिवस खूप चांगला जाईल. तुम्हाला नवीन प्रॉपर्टी घ्यायची असेल तर ही इच्छाही पूर्ण होताना दिसत आहे. अनुभवी व्यक्तींशी ओळख होऊ शकते, जी भविष्यात फायदेशीर ठरेल.
मकर (Capricorn):
आज तुमचा दिवस सामान्य जाईल. नोकरीच्या क्षेत्रात कामाचा ताण जास्त असल्याने धावपळ आणि मेहनत जास्त राहील. आज कामात नियमांकडे पूर्ण लक्ष द्या, नाहीतर अडचण येऊ शकते. वाहन वापरताना काळजी घ्या. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. भावंडांशी सुरू असलेले मतभेद संपतील.
कुंभ (Aquarius):
आज व्यवसाय करणाऱ्या लोकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. आज तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने येईल.
मीन (Pisces):
आज बिझनेस करणाऱ्या लोकांना काही मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या सांसारिक सुखाची साधने वाढतील. महत्त्वाच्या कामात घाई करू नका, अन्यथा अडचण येऊ शकते. वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छाही आज पूर्ण होऊ शकते. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते.