Mercury transit in Aquarius set in 2023 (कुंभ राशीत बुध गोचर) : बुध ग्रहाला ज्योतिषशास्त्रात राजकुमार म्हणून बोलले जाते. बुध ग्रहाने शनीच्या मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. मार्च महिन्यात बुध ग्रह 2 वेळेस राशी बदलणार आहे. बुध कुंभ राशीतून गुरु स्वामी असलेल्या मीन राशीत प्रवेश करणार, त्यानंतर महिन्याच्या शेवटी बुध कुंभ राशीतून मंगल ज्या राशीचा स्वामी त्या मेष राशीत प्रवेश करेल.
बुध ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केला कि, त्याचा अस्त होईल. सध्याच्या घडीला सूर्य आणि शनि दोन्ही ग्रह कुंभ राशीतच आहे. सूर्य आणि बुध जवळ असल्याने सूर्याच्या प्रभावाने बुध अस्त होणार. साधारण महिनाभर बुध स्थिर राहणार.
विशेष बाब म्हणजे आता शनि पण कुंभ राशीत प्रवेश करत आहे. चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीत बुध ग्रहाच्या प्रवेशाचा तुमच्या जीवना वर काय परिणाम होईल, कोणत्या राशीच्या लोकांना धनसंपत्ती, आर्थिक प्रगती, आगामी काळात यश मिळू शकते ह्याचा अंदाज लावू शकतो. तसेच कोणत्या राशीच्या लोकांनी संमिश्र काळात काय करू नये हे समजेल.
मेष :
मेष राशीच्या लोकांसाठी बुध गोचर होणे चांगले असणार आहे. नोकरदार लोकांसाठी हा काळ चांगला उत्तम राहील, तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. तुमच्या प्रेम जीवन थोडी तणावपूर्ण स्तिथी असू शकते. बुध ग्रहाशी संबंधित हा उपाय तुम्ही करू शकता. शक्य झाल्यास भगवान विष्णूच्या श्री वामन रूपाची पूजा-अर्चा करा त्याने लाभ होईल.
वृषभ :
कुंभ राशीत बुधाचा प्रवेश वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल असू शकतो. नोकरीत स्थिरता येईल, तुमचे वरिष्ठ पूर्ण सहकार्य करतील. समाजात तुमची प्रतिमा चांगली राहील. तुम्हाला शक्य असल्यास पुढील एक महिना गायीला नियमितपणे चारा द्या, त्याने तुमचे भाग्य चमकेल.
सिंह :
सिंह राशीसाठी बुध गोचर अनुकूल ठरणार आहे. व्यावसायिकांसाठी हा गोचर काळ अनुकूल असेल. तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल हा चांगला आहे. कुटुंबात काही मतभेद राहू शकतात त्यामुळे थोडा तणाव वाढू शकतो. तुमच्या वाणीवर संयम ठेवा म्हणजे सर्व काही व्यवस्थित होईल. दर बुधवारी श्री गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण किंवा श्रवण करणे लाभदायक राहील.
तूळ :
तूळ राशीच्या लोकांसाठी हे बुध गोचर सकारात्मक असणार आहे. तुमची कार्यक्षमता वाढू शकते. या काळात धन लाभ होण्याची चांगली शक्यता आहे. तुम्हाला तुमची प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी काळ खूप चांगला असेल. तुम्हाला शक्य झाल्यास बुधवारी गरजूंना कपडे दान करा.