बुध आणि शुक्र ग्रह शनिदेवाच्या मकर राशीत एकत्र आल्याने तयार झाला लक्ष्मी नारायण राजयोग, या 4 राशीच्या लोकांना होणार लाभ

2022 हे वर्ष संपायला फक्त 3 दिवस राहीले असून, कालच म्हणजे 28 डिसेंबरला बुध ग्रहाने मकर राशीत प्रवेश केला असून आज 29 डिसेंबरला शुक्र ग्रह मकर राशीत प्रवेश करत आहे. बुध संक्रमण आणि शुक्र संक्रमण झाल्याने काही राशीच्या लोकांना येणारा काळ शुभ फलदायी असणार आहे.

लक्ष्मी नारायण राजयोग

शनी महाराजांच्या मकर राशीत बुध आणि शुक्र ग्रह एकत्र आल्याने लक्ष्मी नारायण राजयोग तयार झाला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हा लक्ष्मी नारायण राजयोग समजला जातो, कारण ह्या योगाचे काही राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत अतिशय शुभ फळ प्राप्त होतात.

चला तरी मग माहिती करून घेऊया त्या कोणत्या राशीचे लोक आहेत ज्यांना ह्या लक्ष्मी नारायण राजयोग तयार झाल्याने सोनेरी दिवस दिसणार आहेत.

मेष राशी: बुध आणि शुक्र संक्रमणामुळे जो लक्ष्मी नारायण राजयोग बनला आहे त्याने मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला दिसून येईल. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होण्याचे संकेत आहेत, जबाबदारी सोबतच पगारवाढ होऊ शकते.

तसेच व्यापारात प्रगती होईल त्यामुळे आर्थिक स्तिथी पाहिल्या पेक्षा मजबूत होईल, धनलाभ होण्याचे संकेत मिळत आहे. तसेच जरी काही नवीन सुरु करण्याचा विचार असेल तर हा काळ खूप चांगला आहे. ह्या राशीच्या विवाहित लोकांचा जोडीदारासोबत काळ आनंदी राहील. 

मिथुन राशी: मिथुन राशीच्या लोकांना लक्ष्मी नारायण राजयोगाचे अतिशय शुभ फळ मिळतील. कार्यक्षेत्रात आत्मविश्वास वाढल्याने नोकरी व्यापारात प्रगती होईल. वरिष्ठ अधिकारी, सहकारी यांचे सहकार्य मिळाल्याने एखादे पद मिळेल, शिवाय धन प्राप्ती उत्तम होणार आहे. कुटुंबासोबत धार्मिक कार्य करण्याचे नियोजन होईल.

तूळ राशी: बुध आणि शुक्राचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांना उत्कृष्ट फळ देणारे असणार आहे. जीवनातील समस्या अडचणी दूर होतील, आत्मविश्वास वाढेल आर्थिक समस्या दूर होतील. नोकरी व्यवसायात धनलाभ होतील, तसेच वैवाहिक जीवन सुखी राहील.

वृश्चिक राशी: वृश्चिक राशीच्या लोकांना बुध आणि शुक्राच्या संक्रमणाने मानसिक शांती आणि बळ मिळणार आहे. आरोग्याच्या समस्या दूर होतील, धार्मिक कार्यात अधिक मन लागेल. आर्थिक स्तिथी सुधारेल त्यामुळे जीवनात आनंद राहील.

Follow us on