Horoscope for January 1, 2023: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चमकणार या 3 राशींचे भाग्य; जाणून घ्या सविस्तर

Daily Rashi Bhavishya 1 January 2023 : आज दिनांक १ जानेवारी २०२३, पौष शुक्ल पक्षाची दशमी तिथी आणि वार रविवार आहे. दशमी तिथी आज संध्याकाळी ७.११ पर्यंत असेल. आज सकाळी ७.२४ पर्यंत शिवयोग चालू राहील, त्यानंतर सिद्धयोग सुरू होईल. यासोबतच आज दुपारी १२.४९ पर्यंत अश्विनी नक्षत्र राहील, त्यानंतर भरणी नक्षत्र होईल. याशिवाय आज शांब दशमी आहे. जाणून घ्या कसा जाईल तुमचा आजचा दिवस.

1 जानेवारी 2023 चे राशिभविष्य

मेष ते मीन राशीचे 1 जानेवारी 2023 चे राशिभविष्य पुढील प्रमाणे सविस्तर: 

मेष राशीचे 1 जानेवारी 2023 चे राशिभविष्य: मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फलदायी स्वरूपाचा जाणार आहे. कुटुंबा सोबत आजचा दिवस आनंदी जाणार आहे. बराच दिवसा पासून अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. महत्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा विलंब झाल्याने चिंता वाढेल.

वृषभ राशीचे 1 जानेवारी 2023 चे राशिभविष्य: वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगला जाणार आहे. आज नशिबाची साथ लाभेल, त्यामुळे कोणतीही अपूर्ण आज पूर्ण होऊ शकते. कार्यक्षेत्रात चांगले संबंध ठेवा, त्याचा तुम्हाला फायदाच होईल. एखादी नवीन मालमत्ता किंवा वाहन  खरेदीची योजना बनू शकते. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील.

मिथुन राशीचे 1 जानेवारी 2023 चे राशिभविष्य: आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील, भावंडांच्या सहकार्याने तुम्ही नवीन काम सुरु करू शकता. आज एखादी चांगली बातमी मिळण्याचे संकेत आहेत. तुमचे विचार सकारात्मक राहिल्याने सर्वांसोबाबत आजचा दिवस आनंदी जाईल.

कर्क राशीचे 1 जानेवारी 2023 चे राशिभविष्य: आज कर्क राशीच्या लोकांचे अनेक दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होऊ शकते. व्यवसायात नफा वाढण्याचे संकेत आहेत, एखाद्या चांगल्या बातमीमूळे खूप आनंदी असाल. जुनी समस्या दूर झाल्याने मन खूप प्रसन्न राहील. नवीन वर्षाच्या दिवसाला वाहन खरेदीचा विचार होऊ शकतो. कोणाशी हि वाद होणार नाही याची काळजी घ्या.

सिंह राशीचे 1 जानेवारी 2023 चे राशिभविष्य: सिंह राशीच्या लोकांचा मान सन्मान वाढेल. तुमची एखादी मानसिक चिंता दूर होऊ शकते. तुमच्या मेहनतीने मोठे यश मिळू शकते. जवळच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल, त्यामुळे घरातील सर्व सदस्य आनंदी होतील. तुम्ही कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडलं.

कन्या राशीचे 1 जानेवारी 2023 चे राशिभविष्य: आजचा दिवस कन्या राशीच्या व्यावसायिकांना चांगला राहील. आज काही अनपेक्षित लाभ होण्याचे संकेत आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल, कामाचा जास्त ताण घेऊ नका सकारात्मक राहा. सर्वांशी नम्रपणे वागा, गर्व करू नका अन्यथा तुम्हालाच त्याचा त्रास होईल.

तूळ राशीचे 1 जानेवारी 2023 चे राशिभविष्य: आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी चांगला आहे. आपणास बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात आणि आपल्या घरगुती आरामात वाढ होईल. तुम्ही तुमच्या पालकांसह मंदिराला भेट देऊ शकता आणि कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण करू शकते. सावकारांशी व्यवहार न करण्याची काळजी घ्या, अन्यथा तुम्हाला पैसे गमावावे लागू शकतात.

वृश्चिक राशीचे 1 जानेवारी 2023 चे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस व्यस्त असेल. असे कोणतेही काम करू नका जे पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल, अन्यथा नंतर समस्या उद्भवू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. तुमचे काम इतरांवर सोडू नका, अन्यथा तुम्ही तुमचे काम नीट करू शकणार नाही. जर तुम्ही गरजूंना मदत करू शकत असाल तर करा.

धनु राशीचे 1 जानेवारी 2023 चे राशिभविष्य: आजचा दिवस धनु राशीसाठी चांगला आहे. नोकरीत काम करणाऱ्या लोकांना मनाप्रमाणे यश मिळाल्यास त्यांना आनंद होईल. व्यवसायात चांगला नफा मिळवण्यात यश मिळेल. तुमची कोणतीही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते. अर्थव्यवस्था मजबूत होईल. तुमची कमाई वाढेल. तुम्ही तुमच्या जुन्या मित्राला खूप दिवसांनी भेटू शकता, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल.

मकर राशीचे 1 जानेवारी 2023 चे राशिभविष्य: जर तुम्ही आनंदाच्या आणि चांगल्या गोष्टी घडण्यासाठी शोधत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला तुमच्या काही दूरच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी देखील ऐकू येईल. तुमचे अपूर्ण काम पूर्ण होईल आणि तुम्ही काहीतरी मोठे नियोजन करण्यात व्यस्त असाल. तुमचे मित्र तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील.

कुंभ राशीचे 1 जानेवारी 2023 चे राशिभविष्य: आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. घरातील सदस्यासोबत वाद होऊ शकतो, ज्यामुळे तुमचे मन चिंताग्रस्त होईल. तुमच्या राग व्यक्त होणार नाही ह्याची काळजी घ्या. आज कोणालाही पैसे उधार देऊ नका, कारण ते परत मिळणे कठीण होईल. घाईघाईत कोणतीही गुंतवणूक करू नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.

मीन राशीचे 1 जानेवारी 2023 चे राशिभविष्य: आजचा दिवस असा आहे जिथे गोष्टी नियोजित केल्याप्रमाणे होत नाहीत. तुम्हाला तुमच्या काही कामाबाबत काळजी वाटू शकते आणि तुम्हाला तुमच्या प्रवासात असताना वाहन काळजीपूर्वक चालवावे लागेल. तुम्ही एखाद्याला दिलेले पैसे तुम्हाला लवकरच मिळू शकतात आणि तुमच्या पालकांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतील.

Follow us on