Satish Kaushik Last Words Before Death: अभिनेता, विनोदी अभिनेता आणि चित्रपट निर्माते सतीश कौशिक यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला. चित्रपटसृष्टी पासून ते त्याच्या चाहत्यांपर्यंत सर्वानाच हे स्वीकारणे कठीण आहे कि ते आता आपल्यात नाही आहेत. त्याच वेळी, त्यांचे कुटुंब या खोल धक्क्यातून अजून बाहेर पडू शकलेले नाही. सतीश कौशिक यांच्या शेवटच्या काळात त्यांचे व्यवस्थापक संतोष राय हे त्यांच्यासोबत होते. आता संतोष राय यांनी सतीश कौशिक याचे शेवटचे क्षण सांगितले आहे.
संतोष राय यांनी टाईम्स ऑफ इंडियाला माहिती देताना त्या रात्री काय घडले या बद्दल माहिती सांगितली आहे. संतोष हे गेल्या 34 वर्षांपासून सतीश कौशिक यांच्या सोबत काम करत होते. संतोष सांगतात कि, बुधवारी रात्री 8.30 च्या सुमारास जेवण होते आणि त्यानंतर सतीश याना कोणतीच अस्वस्थता जाणवली नाही. 9 मार्चला सकाळी 8:50 च्या फ्लाईटने आम्ही मुंबईला परत येणार होतो. सर मला बोलले कि, ‘संतोष लवकर झोप, सकाळची फ्लाईट पकडायची आहे.’ त्यावर मी हो सर बोललो आणि पुढच्या रूम मध्ये झोपलो.
‘कागज 2’ बघत होते
संतोष पुढे सांगतात कि, सतीश सरांचा रात्री 11 वाजता मला फोन आला आणि मला बोलले कि, “संतोष इकडे ये मला एडिटिंगसाठी ‘कागज 2’ (कौशिक दिग्दर्शित चित्रपट ज्याचे शूटिंग पूर्ण झाले आहे) पहायचे आहे पण वायफायचा पासवर्ड सेट करून दे”. त्यारात्री 11:30 वाजता सरांनी मूवी बघायला सुरुवात केली त्यानंतर मी झोपायला आपल्या रूम मध्ये निघून गेलो.
अचानक श्वास घेण्यास त्रास
संतोष सांगतात कि, रात्री साधारण 12:05 वाजता सर मला जोर जोरात आवाज द्यायला लागले. मी धावत त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना विचारले कि, “काय झाले सर? का ओरडत आहे? मला फोन का केला नाही?” तेव्हा ते मला म्हणाले कि, “ऐक, मला श्वास घेण्यास त्रास होत आहे, कृपा करून मला डॉक्टरांकडे घेऊन जा.” त्यानंतर मी ताबडतोब गाडी काढली आणि सरांना गाडीत बसवले. त्यावेळी ड्रायव्हर आणि अंगरक्षकही आमच्यासोबत होते.
‘मला मरायचे नाही’
संतोष सांगतात कि, सरांना घेऊन आम्ही हॉस्पिटलला निघालो तेव्हा त्यांच्या छातीत दुखत होते, ते बोलत होते “चला लवकर हॉस्पिटलला जाऊ”. त्यांनी माझ्या खांद्यावर डोकं ठेवला आणि मला म्हणाले “संतोष मला मरायचं नाही, मला वाचव.” त्यांनी मला पकडून ठेवले आणि बोलले कि, “मला वंशिकासाठी जगायचं आहे, मला वाटत नाही मी जीवनांत राहील. शशी आणि वंशिकाची काळजी घ्या.” त्यादिवशी होळी होती म्हणून रस्ता रिकामा असल्याने आम्ही आठ मिनिटात हॉस्पिटलला (फोर्टिस हॉस्पिटल) पोचलो. हॉस्पिटलमध्ये पोहचेपर्यत सर बेशुद्ध झाले होते.
8 आणि 9 मार्चच्या मध्यरात्री सतीश कौशिक यांनी या जगाचा निरोप घेतला. 9 मार्च रोजी मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी शशी आणि मुलगी वंशिका असा परिवार आहे.