करण जोहरने केली मोठी चूक, अभिषेक समोर ऐश्वर्याला सलमान बद्दल केला प्रश्न, अशी केली बोलती बंद

करण जोहरचा शो ‘कॉफी विथ करण‘ हा लोकप्रिय शो आहे. या शोमध्ये, सेलिब्रिटी अनेकदा रॅपिड फायर राउंडमध्ये मसालेदार आणि मजेदार खुलासे करताना दिसतात. या शोमध्ये एकदा अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या दिसले होते. त्या एपिसोडचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये करण जोहरने ऐश्वर्या रायला अभिषेक बच्चन समोर सलमान खानशी संबंधित एक वैयक्तिक प्रश्न विचारला, तिच्या उत्तराने करण जोहर स्वत: सुद्धा आश्चर्यचकित झाला.

करण जोहर अनेकदा त्याच्या शोमध्ये सेलिब्रिटींकडून त्याच्या आयुष्यातील रहस्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे खुलासेही केले आहेत. अनेकदा चर्चेत राहणाऱ्या करणच्या या शोमध्ये ऐश्वर्याला असाच प्रश्न विचारण्यात आला होता. अलीकडेच, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, जेव्हा ऐश्वर्या अभिषेक बच्चन समोर सलमान बद्दल विचारले गेले तेव्हा ऐश्वर्याने तिच्या पतीसमोर अगदी स्पष्टपणे उत्तर दिले आणि आपला मुद्दा ठेवला आणि करण जोहरला धक्काच बसला. मात्र, यादरम्यान अभिषेक जरा वेगळ्याच मूड मध्ये दिसला.

अशा प्रकारे ऐश्वर्याने करणची केली बोलती बंद

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये करण जोहर ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांना एक प्रश्न विचारतो, बॉलिवुड मधील “खान ऑफ ऑल सीझन” कोण आहेत. या प्रश्नात त्याने शाहरुख खान, सैफ अली खान, आमिर खान आणि सलमान खान यांची नावे सांगितली. या प्रश्नानंतर अभिषेकही करणशी वाद घालताना दिसला की इंडस्ट्रीमध्ये इतरही कलाकार आहेत, पण ऐश्वर्याने या प्रश्नाला इतके सुंदर उत्तर दिले की खुद्द करण ही आश्चर्यचकित झाला आणि त्याची बोलती बंद झाली.

प्रश्नाचे उत्तर देताना ऐश्वर्याने बच्चन कुटुंबाचे घेतले नाव

या प्रश्नाच्या उत्तरात ऐश्वर्या म्हणाली की, जर सर्व सीझनचा विषय असेल तर मला बच्चन कुटुंबाचे नाव घ्यायला आवडेल. ज्यांची राजवट बॉलिवूडवर कायम आहे. ऐश्वर्याने समर्पक उत्तर दिले आणि म्हणाली आम्ही सर्व सीझनचे बच्चन आहोत आणि माझे नाव खान नाही. पण यातून स्पष्ट होते की तिने आपला मुद्दा अतिशय हुशारीने मांडला आहे, यावरून ती बच्चन कुटुंबाची सूनअसल्याने किती आनंदी आहे हे दिसून येते.

PS 2: ऐश्वर्याचे कौतुक केल्याने एका युजरने अभिषेक बच्चनला ट्रोल करण्याचा केला प्रयत्न, अभिषेकने दिले सडेतोड उत्तर

ऐश्वर्या आणि सलमानची पहिली भेट भन्साळींच्या ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटात काम केल्यानंतरच दोघांमधील जवळीक वाढू लागली. त्यांच्या अफेअरच्या बातम्या अनेकदा चर्चेत असत. मात्र, 2002 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले आणि तेही अनेक वादात सापडले. 2007 मध्ये तिने अभिषेक बच्चन सोबत लग्न केले. ऐश्वर्या आणि अभिषेकने ‘गुरू’, ‘ढिशूम 2’, ‘उमराव जान’, ‘सरकार राज’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

Follow us on

Sharing Is Caring: