मणिरत्नम दिग्दर्शित Ponniyin Selvan पार्ट-2 चित्रपटगृहात दाखल झाला आहे. पहिल्या भागानंतर चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. PS-2 मध्ये पुन्हा एकदा चियान विक्रम, ऐश्वर्या राय, जयम रवी, कार्ती, त्रिशा आणि शोभिता धुलिपाला त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवताना दिसतात. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत तिकीट खिडकीवर 48 कोटी रुपये जमा झाले आहेत. दरम्यान, ऐश्वर्याचा पती अभिषेक बच्चन यानेही या चित्रपटाचा आढावा घेतला आहे.
PS 2 पाहिल्यानंतर त्यांनी मणिरत्नम यांच्या चित्रपटाची जोरदार प्रशंसा केली. थिएटरमध्ये स्टारकास्टसह चित्रपट पाहिल्यानंतर अभिषेकने ट्विटरवर टीमसाठी एक विशेष नोट लिहिली. तसेच, त्यांनी ऐश्वर्याच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा केली आणि चित्रपटातील तिच्या अभिनयाचे वर्णन केले.
त्याने पोस्टमध्ये लिहिले, “PS2 हा एक उत्तम चित्रपट आहे!!! कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत. मी भारावून गेलो आहे मणिरत्नम, विक्रम, त्रिशा, जयराम, कार्ती आणि चित्रपटाशी संबंधित उर्वरित कलाकार आणि क्रू यांच्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन. माझ्या पत्नीच्या सर्वोत्तम कामगिरीचा मला अभिमान आहे”
या ट्विटवर एका यूजरने त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, ज्याला अभिषेकने चोख प्रत्युत्तर दिले. युजरने लिहिले, “आता तिला आणखी चित्रपट साइन करू द्या आणि तू आराध्याची काळजी घे.” युजरच्या या ट्विटला सडेतोड उत्तर देत अभिषेक म्हणाला, “तिला साइन करू द्या? सर, तिल काहीही करण्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही. खासकरून ती ज्याच्यावर प्रेम करते.”
ही दुसरी वेळ आहे जेव्हा विक्रम आणि ऐश्वर्याने चित्रपटात स्क्रीन स्पेस शेअर केली आहे. यापूर्वी दोघेही मणिरत्नम यांच्या रावण या चित्रपटात एकत्र दिसले होते. PS 2 ही 1955 मध्ये कल्की कृष्णमूर्ती यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. हा चित्रपट मद्रास टॉकीज आणि लायका प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनवला आहे.