LPG Cylinder Price: ग्राहक पुन्हा गॅस वर; नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG सिलिंडर इतक्या रुपयाने महागले जाणून घ्या नवीन दर

LPG Cylinder Price: नवीन वर्षाची सुरुवात होऊन काही तास झाले नाही तर सर्व सामान्य लोकांच्या खिशाला कात्री लावणारी पहिली बातमी समोर आली आहे. काही लोकांचे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन अजून चालूच असेल आता आनंदावर पाणी टाकणारी बातमी म्हणजे LPG गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. 

व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत वेगाने वाढवण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी 24 ते 25.5 रुपये अधिकचे द्यावे लागणार आहे. पण दिलासा दायक बाबत म्हणजे सध्या घरगुती गॅस सिलेंडरचे दरवाढ झाले नाही.  

LPG Cylinder Price

गेल्यावर्षी सरकारने जुलै 2022 पर्यंत चारवेळा घरगुती गॅस सिलेंडरचे भाव वाढवून झाले आहे, त्यानंतर मात्र दरवाढ केली नाही.

व्यावसायिक LPG Cylinder Price पुढील प्रमाणे :  

  • मुंबईत 25 रुपये दरवाढ झाल्याने आता नवीन सिलेंडरला 1721 रुपये द्यावे लागतील.
  • दिल्लीत 25 रुपये दरवाढ झाल्याने आता नवीन सिलेंडरला 1769 रुपये द्यावे लागतील.
  • कोलकत्याला 24 रुपये दरवाढ झाल्याने आता नवीन सिलेंडरला 1869 रुपये द्यावे लागतील.
  • चेन्नईला 25.5 रुपये दरवाढ झाल्याने आता नवीन सिलेंडरला 1917 रुपये द्यावे लागतील.

हे पण वाचा : Rooftop Solar: 25 वर्ष लाईट बिल येईल झिरो; बस्स एकदा लावा घरा वरती हे सोलर पैनल

घरगुती LPG Cylinder Price जैसे थे 

सरकारने घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ केली नाही, त्यामुळे मुंबईत 1052.50, दिल्ली मध्ये 1053, कोलाकात्यात 1079, चेन्नईत 1068.50 रुपये द्यावे लागतात.

सरकारने जुलै 2022 पासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती जैसे थे ठेवल्या असल्या तरी त्याआधी चार वेळा दरवाढ केली होतील.

Follow us on

Sharing Is Caring: