New Labor Law: नवीन कामगार कायदा लागू झाल्यानंतर तुमचा हातातील सॅलरी कमी होणार नाही उलट वाढेल. आता तुम्ही ऐकलेच असेल की New Labor Law लागू झाल्यानंतर नवीन सॅलरी स्ट्रक्चर नुसार तुमची इन हँड सॅलरी कमी होईल.
कारण बेसिक सॅलरी 50% असेल. यामुळे रिटायरमेंट फंड मध्ये अधिक पैसे कट होतील. भत्त्यांची (Allowances) मोठी रक्कम कमी होईल. पण आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत की नवीन सॅलरी स्ट्रक्चर आल्यानंतरही तुमची इन हँड सॅलरी कमी होणार नाही उलट वाढेल.
New Labor Law लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या सॅलरी वर काय परिणाम होईल आणि सॅलरी स्ट्रक्चर कसे बदलेल ह्याची अद्याप औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. पण, येणाऱ्या पुढील काही महिन्यांत ह्या नवीन नियमाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
बेसिक सॅलरी 50% असेल
आम्ही तुम्हाला सांगतो की सरकारने 29 कामगार कायदे (Labour law) जोडून 4 नवीन कामगार संहिता (New Labour Codes) तयार केल्या आहेत. नवीन कायद्यातील तरतुदींनुसार, कंपन्या त्यांच्या कर्मचार्यांना देतील त्या पगारातील एकूण पगाराच्या (CTC) 50% बेसिक सॅलरी असेल. म्हणजेच बेसिक सॅलरी जी पूर्वी 30-35 टक्के असायची, त्यात थेट 15 टक्के वाढ होईल आणि उर्वरित 50 टक्के रीइंबर्समेंट-अलाउंस चा भाग असेल.
हे हि वाचा : Reliance Jio: 5G येण्यापूर्वी मोठा फायदा, 29 लाखांहून अधिक नवीन ग्राहक जोडले
सध्याच्या सॅलरी स्ट्रक्चर मध्ये काय आहे?
समजा एखाद्याचा महिन्याला सॅलरी 1.5 लाख रुपये म्हणजे 18 लाख रुपये वर्षाला पॅकेज आहे. सध्याच्या वेतन रचनेत, बेसिक सॅलरी CTC च्या 32% आहे. म्हणजेच 1.50 लाखांच्या मासिक CTC मध्ये, बेसिक सॅलरी 48,000 रु. असेल. मग 50 टक्के म्हणजे रु. 24,000 HRA नंतर NPS मध्ये 10% बेसिक (रु. 48,000) म्हणजे रु. 4,800 जातील.
जर बेसिक सॅलरीच्या 12% प्रॉविडेंट फंड (PF) मध्ये गेल्यास 5,760 रुपये दरमहा EPF मध्ये जातील. अशाप्रकारे तुमचे 1.50 लाख रुपयांचे मासिक CTC 82,560 रुपये झाले आहे. म्हणजे उर्वरित 67,440 रुपये इतर वस्तूंद्वारे दिले जात आहेत. यामध्ये विशेष भत्ता, इंधन आणि वाहतूक, फोन, वर्तमानपत्र आणि पुस्तके, वार्षिक बोनस मधील मासिक हिस्सा, ग्रॅच्युइटी या घटकांचा समावेश आहे.
किती टॅक्स लावला जातो, पगार किती आहे आणि रिटायरमेंट सेविंग्स किती आहे?
तुमच्या एकूण CTC पैकी रु. 1.10 लाखावर टॅक्स आकारला जाईल. म्हणजे CTC चा 6.14 टक्के टॅक्स. टेक होम सॅलरी – रु 1.14 लाख, CTC च्या 76.1 टक्के. सेवानिवृत्ती बचत – 1.96 लाख रुपये, एकूण 10.9 टक्के CTC.
HRA मध्ये कमी टॅक्स सूट मिळेल
नवीन नियमानुसार, समजा वार्षिक बेसिक सॅलरी 9 लाख रुपये असेल तर HRA 4,50,000 रुपये होईल. परंतु, तुम्हाला फक्त 2,42,400 रुपयांवर टॅक्स सूट मिळेल. म्हणजे 2,07,600 रुपयांवर टॅक्स भरावा लागेल.
यापूर्वी, तुम्हाला HRA च्या हेडखाली मिळणाऱ्या 45,600 रुपयांवर टॅक्स भरावा लागत होता. नवीन सॅलरी स्ट्रक्चर मध्ये HRA वरील टॅक्स मध्ये मोठी वाढ होणार आहे. तुम्ही वार्षिक CTC वरील टॅक्सची तुलना केल्यास, आता तुम्हाला 1.10 लाख (एकूण CTC च्या 6.1%) टॅक्स भरावा लागेल, जो नवीन स्ट्रक्चर नुसार रु. 1.19 लाख (एकूण CTC च्या 6.6%) असेल.