Home loan transfer process: प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते कि स्वतःच घर घ्यावे, त्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत असतो. बँकांच्या मदतीने स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत होते. जेव्हा Home loan घेतले जाते ते मोठया कालावधीसाठी म्हणजे साधारण २० वर्ष, १० वर्षाच्या कालावधीसाठी घेतले जाते ज्यामुळे महिन्याला EMI कमी राहील आणि बँकेचे हप्ते भरणे सोईस्कर राहील.
परंतु वेळोवेळी बँकांच्या व्याज दरात बदल होत राहतात त्यामुळे होम लोनच्या EMI मध्ये वाढ होत राहते. अशा परिस्थितीत आपल्या समोर एक पर्याय असतो तो म्हणजे एका बँक मधून दुसऱ्या बँक मध्ये Home loan ट्रान्सफर करून EMI कमी करून घेण्याचा. आज आम्ही तुम्हाला त्याच्याच बद्दल माहिती सांगणार आहोत.
हि आहे Home Loan Transfer करण्याची प्रक्रिया:
होम लोन ट्रान्सफर करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला एक नवीन बँक शोधावी जी चे होम लोनचे व्याजदर कमी असावे ज्यामुळे तुमचा EMI कमी होऊ शकेल.
त्याच सोबतच तुम्ही तुमच्या जुन्या बँक मध्ये फोरक्लोजरचे आवेदन देखील करू शकता, सोबत अकाउंट स्टेटमेंट आणि प्रॉपर्टीचे कागदपत्र देखील प्राप्त करू शकता. त्यानंतर जुनी बँक तुम्हाला NOC लेटर देईल जे तुम्हाला तुमच्या नवीन बँकेत जमा करावे लागेल.
Home Loan Tranfer Documents:
होम लोन ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हा KYC चे कागद, प्रॉपर्टी पेपर, लोन बॅलन्सचे कागद, व्याज दराचे कागद इत्यादी तयार करून ठेवावे लागतील. दुसऱ्या नवीन बँकेची सर्व प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला जुन्या बँक मधून सहमती पत्र मागावे लागेल आणि त्याच्या आधारे लोन बंद करतील, त्यानंतर नवीन बँक मध्ये तुमचे EMI सुरु होईल.
Home Loan ट्रान्सफर करताना ह्या गोष्टी देखील महत्वपूर्ण आहे:
जर तुम्ही होम लोन ट्रान्सफर करायच्या पहिले नवीन बँकेच्या होम लोन ट्रान्सफर आणि प्रोसेससिंग फी बद्दल सर्व माहिती करून घ्या. जर तुम्ही ह्या खर्चाची माहिती केली नाही तर तुम्हाला नंतर अडचण येऊ शकते. ह्यासोबतच बँकेचे अन्य काही चार्जेस असतील तर त्याची माहिती नक्की करून घ्या.