Gold Price Today: गेल्या आठवड्यापेक्षा सोने-चांदी झाले 2300 रुपयांनी स्वस्त; आताच करा खरेदी

Gold Price Today: गेल्या आठवड्यापेक्षा सोने-चांदी झाले 2300 रुपयांनी स्वस्त; सोन्याच्या दरात (Gold rate today) 80 रुपयांची घसरण तर चांदीच्या दरातही (Silver price today) 622 रुपयांनी मोठी घसरण झालेली.

Gold Price Today: आज पण सोन्या-चांदीच्या किंमतीवर दबाव दिसून येतो आहे. डोमेस्टिक मार्केट मध्ये MCX वर आज सोन्याच्या दरात (Gold rate today) 80 रुपयांची घसरण झालेली आहे. सध्याच्या वेळी 55352 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या स्तरावर आहे. चांदीच्या दरातही (Silver price today) 622 रुपयांनी मोठी घसरण झालेली असून ती 62811 रुपये प्रति किलो या स्तरावर आहे. इंटरनेशनल मार्केट, स्पॉट गोल्डची किंमत $1809 प्रति औंस इतकी आहे, तर चांदीची किंमत $20.62 प्रति औंस इतकी आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून सांगण्यात आले कि, महागाई अजूनही अपेक्षेप्रमाणे खाली आलेली नाही. अशा परिस्थितीत व्याजदरातील वाढ कायम राहील. येणाऱ्या काळात देखील दर वाढीची प्रक्रिया सुरू राहील.

गेल्या आठवड्या पेक्षा सोने (Gold Price Today) आणि चांदी 2300 रुपयांनी झाले स्वस्त

डॉलरच्या मजबूतीमुळे गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) 2,300 रुपयां पर्यंतची घसरण पाहण्यात आली. MCX वर सोन्याचे दर (Gold Price Today) 850 रुपयांनी तर चांदीचे दर 2250 रुपयांनी कमी झाले. गोल्ड प्राईस वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, एका महिन्यात इंटरनेशनल मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत $111 म्हणजेच सुमारे 5.75 टक्के सुधारणा झाली आहे. चांदी $2.82 ने सुधारली आहे, म्हणजे सुमारे 12 टक्के.

डॉलरचा निर्देशांक 7 आठवड्यांच्या उच्चांकावर

डॉलर निर्देशांक (Dollar Index) सध्या 105.19 च्या स्तरावर आहे. गेल्या पाच दिवसांपासून त्यात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. सलग पाचव्या आठवड्यात डॉलर निर्देशांक मजबूत झाला आहे. हा निर्देशांक सोन्यासाठी नकारात्मक वातावरण निर्माण करत आहे.

एक्सपर्ट नुसार किती होणार सोन्याची किंमत ? 

IIFL सिक्युरिटीजचे कमोडिटी तज्ज्ञ अनुज गुप्ता यांनी सांगितले की, फेडरल रिझर्व्ह अजूनही महागाईमुळे चिंतेत असल्याने त्यामुळे व्याजदर वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver latest price) सुधारणा झाली. डॉलर निर्देशांक सात आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला असून त्याने 105 ची पातळी पार केली. या आठवड्यात MCX वर सोन्याला 55200 रुपयांचा सपोर्ट आहे, तर 62500 वर चांदीला सपोर्ट आहे. तांत्रिक आधारावर, सोने आणि चांदीसाठी मंदीचा चार्ट दिसतो.

अल्प ते मध्यम कालावधीसाठी सोन्या-चांदीवर राहील दबाव

ब्रोकरेज फर्म शेअरखानने आपल्या अहवालात म्हटले आहे की MCX वर सोने आणि चांदीचा कल अल्प ते मध्यम कालावधीसाठी नकारात्मक आहे. अल्प मुदतीसाठी सोन्याचा सपोर्ट 55000 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि प्रतिकार 56400 रुपये आहे. चांदीचा आधार 61730 रुपये आणि प्रतिरोध 66250 रुपयांवर आहे.

Follow us on

Sharing Is Caring: