Child Investment 2023: मुलांच्या भविष्याची चिंता सोडा; नवीन वर्षात अशी करा गुंतवणूक म्हणजे होईल छप्परफाड कमाई

Child Investment 2023: तुम्ही देखील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा (Child Investment Plan) विचार करत असाल तर, तुमच्यासाठी ह्या योजनेत (Schemes) गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. नवीन वर्षात सुरुवात करून तुम्ही मुलांच्या उच्च शिक्षण आणि पुढील वाटचालीसाठी पैसे उभे करू शकाल. येथे तुम्हाला अशाच एक योजने बद्दल माहिती समजणार आहे.

हि योजना पोस्ट खात्याची असून या योजनेत तुम्हाला शेअर बाजारा किंवा म्युच्युअल फंड (Mutual Fund) पेक्षा परतावा हा कमी असला तरी गुंतवणूक जोखीम मुक्त आहे. ह्या मुदत ठेव योजनेत सुरक्षित परताव्याची हमीपत्र मिळते. मुलांसाठीच्या योजनात पाच वर्षाच्या FD वर 6.7% व्याज मिळतो.

Child Investment 2023

जर तुम्ही 5 वर्षांसाठी 5 लाख रुपयांची FD केली तर तुम्हाला 6.97 लाख रुपये मिळतील आणि जर तुम्ही 10 वर्षांसाठी FD कराल तर तुमचे पैसे जवळपास दुप्पट होईल. म्हणजे FD चा कालावधी अजून 5 वर्षांसाठी वाढवला तर 5 लाखाचे 9.71 लाख होतील, आणि 15 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर 13.54 लाख होतील.

Child Investment 2023 Schemes:

सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केल्यास 7.6% व्याज दर मिळतो. या योजनेचा कालावधी 15 वर्षांचा असून 21 वर्षांनी मॅच्युअरिटी झाल्या नंतर पैसे परत मिळतील. जर तुम्ही दर महिन्याला 2000 रुपयांची बचत केली तर तुम्हाला 10,18,425 रुपये मिळतील आणि जर तुम्ही 2000 ऐवजी 3000 रुपयांची गुंतवणूक केली तर 15,27,637 रुपयांचा परतावा मिळेल.

पब्लिक प्रोव्हिडंड फंड (PF) हि योजना 15 वर्षांची असून ती देखील गुंतवणुकीसाठी फायदेशीर आहे. PPF वर 7.1% व्याजदर मिळतो. या योजनेत वार्षिक 1.5 लाख रुपये गुंतवणूक करू शकता. महिन्याला 5000 जमा केल्यास 7,27,284 रुपयांचे व्याज मिळेल आणि मॅच्युरिटीनंतर 16,27,284 रुपये एवढी रक्कम मिळेल.

हे पण वाचा : Rooftop Solar: 25 वर्ष लाईट बिल येईल झिरो; बस्स एकदा लावा घरा वरती हे सोलर पैनल

सध्या अनेक जण भविष्याचा विचार करून जोखीममुक्त गुंतवणूक (Investment) म्हणून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत आहे. जर दीर्घ कालावधीचा विचार केला तर यामध्ये कम्पाऊंडिंगचा मोठा फायदा मिळू शकतो. सध्या बहुतेक लोक सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे गुंतवणूक करून 12 ते 20 टक्क्यांपर्यंत परतावा मिळवू शकतात.

Follow us on

Sharing Is Caring: