7th Pay Commission Matrix: आम्ही तुम्हाला भारत सरकार नवीन वर्षात कर्मचाऱ्यांसाठी कोणते 3 गिफ्ट देणार आहे त्या बाबतीत सांगणार आहे. रिपोर्ट नुसार कर्मचाऱ्यांचा डीए वाढवला जाऊ शकतो, फिटमेन्ट फैक्टर आणि डीएचे थकबाकी पेमेंट केले जाऊ शकते.
2022 हे वर्ष संपत आहे, सरकारी कर्मचाऱ्यांना सरकार कडून मोठ्या अपेक्षा आहेत. तथापि, 2023 नवीन वर्षात, सरकार त्यांच्या पगारावर परिणाम करणारे निर्णय घेण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना तीन भेटवस्तू देणे अपेक्षित आहे. रिपोर्ट नुसार कर्मचाऱ्यांचा डीए वाढवला जाऊ शकतो, फिटमेन्ट फैक्टर आणि डीएचे थकबाकी पेमेंट याबाबतीत निर्णय अपेक्षित आहे.
सरकार कडून 18 महिन्यांच्या 7th Pay Commission थकीत डीए बाबत निर्णय
जानेवारी 2020 ते जून 2021 या कालावधीत कर्मचाऱ्यांना किती पैसे मिळावेत, हे रोजगार विभागाने अद्याप ठरवलेले नाही. कारण हे किती पैसे असू शकतात याबद्दल बरेच अहवाल आले आहेत पण नक्की आकडा ठरत नाही आहे. पुढील वर्षभरात रोजगार विभाग याबाबत निर्णय घेईल, अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे.
फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ
फिटमेंट फॅक्टर वाढल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होईल. फिटमेंट फॅक्टर वाढवायचा की नाही याबाबत लवकरच निर्णय होईल, अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे.
DA ची पुढील वाढ
महागाई वाढत असल्याने सरकार नवीन वर्षात 7th Pay Commission सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 3 ते 5 टक्के वाढ अपेक्षित आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जुलै 2022 पासून सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 4 टक्के महागाई भत्ता वाढवण्यास मंजुरी दिली आहे.