Vastu Tips: हिंदू धर्मात प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कणाकणात देवाचा वास असतो अशी श्रद्धा आहे. जेव्हा आपण देवाची मूर्ती स्वरूपात पूजा करतो, उपासना करतो त्याचे अनेक शुभ फळ आपल्याला प्राप्त होतात. मूर्ती पूजेचे आध्यात्मिक तसेच वैज्ञनिक महत्व आहे. जेव्हा आपण देवाची मूर्ती स्वरूपात पूजा करतो तेव्हा आपण पूजेत पूर्ण अंतःकरणाने समर्पित असतो. त्यामुळे जर चुकून हि पूजा करता करता मूर्ती हातातून पडली, किंवा तिला धक्का लागला तरी आपल्याला खूप वाईट वाटते आणि आपण क्षमा प्रार्थना करतो कारण आपली तशी श्रद्धा त्या मूर्ती सोबत असते.
दरदरोज घरात देवपूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन घरात आनंदी निर्माण होऊन घरात सुख शांती लाभते. पण जर घरातील देवघराची दिशा किंवा त्याचे स्थान चुकीचे असेल तर त्याचे अशुभ परिणाम घरामध्ये होतात. चला तर आपण माहिती करून घेऊया कि वास्तुशास्त्रानुसार (Vastu Shastra) घरात कोणत्या मूर्ती पूजेत ठेवाव्या त्याची माहिती करून घेऊ (Vastu Tips).
Vastu Tips वस्तू टिप्स पुढील प्रमाणे :
- देवघरातची खोली नेहमी स्वच्छ ठेवावी आणि देव्हाऱ्यात कधी हि तुटलेल्या किंवा, चीर गेलेल्या मूर्ती ठेवू नये.
- देवाऱ्याला नेहमी दिवा प्रज्वलित करावा. विशेषतः संध्यकाळी स्नान करूनच देवघरात प्रवेश करावा. स्नान न करता देवाऱ्याला कधी हि स्पर्श करू नये.
- श्रीगणेशाला पुराणात प्रथम स्थान दिले गेले आहे. कोणत्या हि शुभ किंवा धार्मिक कार्याची सुरुवात श्रीगणेशाच्या पूजेने करावी. देवाऱ्यात श्रीगणेशाची एकच मूर्ती असावी. वास्तुशास्त्रानुसार श्रीगणेशाला माता लक्ष्मीच्या डाव्या बाजूस स्थान द्यावे, शिवाय लक्ष्मी मातेच्या डाव्या बाजूला सरस्वती मातेची मूर्ती असावी. म्हणजेच लक्ष्मी मातेला श्रीगणेश आणि सरस्वती मातेच्या मध्ये स्थापना करावे.
- प्लास्टर ऑफ पॅरिसची श्रीगणेशाची मूर्ती नसावी. तसेच श्रीगणेश नृत्य करत आहे अशी मूर्ती देखील नसावी. श्रीगणेशाची मूर्ती नेगमी बसलेली आणि आशीर्वाद देत आहे अशीच असावी.
- घरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती नक्की असावी. ज्याठिकाणी लक्ष्मी मातेचा वास आहे त्याठिकाणी गरिबी कधीच येत नाही. लक्ष्मी मातेच्या कृपेने सुख आणि समृद्धी राहते. लक्ष्मी मातेची मूर्ती नेहमी बसलेली असावी. लक्ष्मी मातेची उभी मूर्ती घरात ठेवू नये. शक्य झाल्यास लक्ष्मी माते सोबतच श्रीविष्णूची मूर्ती ठेवणे अतिशय शुभ समजले जाते.
- देवाऱ्यात संकटमोचन हनुमानाची मूर्ती हि ठेवावी. घरात हनुमानाच्या मूर्तीचे पूजन केल्याने घरगुती त्रास दूर होतो, घरावरील संकटांचा नाश होतो.
- कुटुंबात किंवा भावा भावात काही त्रास असेल तर राम दरबाराची मूर्ती पूजास्थळी अवश्य ठेवा. त्याने घरात सुख शांती राहील.
- देवाऱ्यात शिवलिंग नक्की ठेवा, मात्र शिवलिंग खूप मोठे नसावे. तसेच न चुकता शिवलिंगाला जल आणि दुधाने अभिषेक करावा.
- घरातील मृत व्यक्तींचे फोटो देवाऱ्यात ठेवू नये, तसेच त्यांची पूजा करू नये. पितृपक्षातच त्यांची पूजा करावी.
- घरातील देवाऱ्यात चुकून हि राहु-केतू, शनिदेव आणि काली माता यांची मूर्ती ठेवू नये. ह्या सर्व उग्र देवता असून त्यांची पूजा करणे फार कठीण आहे. जर त्यांच्या पूजेत चूक झाली तर त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील. म्हणून त्या मूर्ती देवघरात ठेवू नये.