Vastu Tips: साफ सफाई करताना हे नियम लक्षात ठेवले तर कायम राहील घरात माता लक्ष्मीचा वास

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात नेहमी स्वच्छता ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते नाही सकारात्मक ऊर्जा राहते, ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन सर्व प्रकारचे सुख उपलब्ध करते.

Vastu Tips: धार्मिक ग्रंथ आणि वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले जाते कि, घरात स्वच्छता ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि अशा ठिकाणी वास करते. स्वछ घरात सकारात्मक ऊर्जा राहते ज्यामुळे मन आनंदी राहते, शरीर निरोगी राहते. माता लक्ष्मीचे आर्शिर्वाद मिळाल्याने घरातील सर्व लोकांची प्रगती होते.

त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरात नेहमी स्वच्छता ठेवण्यास सांगितले जाते. या सवयीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, आणि घरात सुख समृद्धी वाढते. चला तर मग माहिती करून घेऊया स्वच्छतेच्या संदर्भातील काही नियम ज्यांचे पालन केल्यास तुमचे भलेच होईल

घरातील कचरा कधी टाकावा ?

वास्तुशास्त्रानुसार घरातील साफसफाई आणि कचरा बाहेर फेकण्याचा बाबतीत काही वेळ सांगण्यात आली आहे. त्यानुसार कधी हि सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्ता नंतर घराबाहेर कचरा फेकू नये. संध्याकाळची वेळ हि घरात लक्ष्मी येण्याची वेळ मानली जाते. अशा वेळी घरातील कचरा बाहेर काढल्याने लक्ष्मी माता नाराज होते. म्हणूनच संध्याकाळच्या वेळी घरात झाडू मारू नये. घरातील कचरा संध्यकाळी घर बाहेर फेकण्यापेक्षा घरात डस्टबीनमध्ये तो टाकावा, मग दुसऱ्या दिवशी सकाळी फेकून द्यावा.

घराचे मुख्य प्रवेशद्वार स्वच आणि व्यवस्थित ठेवा :

घरात साफसफाई केल्यावर जो कचरा निघतो तो घरासमोर मुख्य दरवाजा समोर जमा करू नये. काही लोक कचरा दरवाजा समोरच जमा करून ठेवतात. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होत नाही, परिणामी घरात गरिबी राहते. म्हणूनच घराचा मुख्य दरवाजाच्या आजूबाजूचा परिसर नेहमी स्वछ ठेवावा.

ह्या वेळेस स्वच्छता करू नये :

ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी कधीही घरात झाडू मारू नये, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. काही कारणास्तव झाडून घेतल्यास कचऱ्याचे ढीग बाजूला ठेवा, कचऱ्याला दाराबाहेर काढू नका. तसेच रात्री झाडू नये नाही तर लक्ष्मी मातेचा कोप होतो.

घरातील कोपरे स्वछ ठेवा :

वास्तुशास्त्रानुसार घरातील सर्व कोपरे नेहमी स्वच्छ ठेवावे. घराची उत्तर दिशा, ईशान्य कोपरा इत्यादी पूर्णपणे स्वच्छ ठेवावा. ह्या ठिकाणी धनाची देवता कुबेर वास करते. विशेषत: ईशान्य, उत्तर आणि वायव्य कोपरे रिकामे आणि स्वच्छ ठेवावे.

झाडू बद्दलचे नियम :

वास्तुशास्त्रानुसार झाडू कधीही उघड्या ठिकाणी ठेवू नये, असे करणे अशुभ मानले आहे. याशिवाय झाडू कधीही उभ्या स्थितीत पण ठेवू नये. हे देखील चांगले मानले जात नाही. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरात दारिद्रय येते, म्हणूनच झाडू नेहमी जमिनीवर ठेवावा. जुना झाडू बदली करण्यासाठी शनिवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. शिवाय नवीन झाडू नेहमी कृष्ण पक्षात खरेदी करावा.

Follow us on

Sharing Is Caring: