Vastu Tips: चुकून देखील लावू नका हे ५ फोटो; नात्यात येऊ शकतो दुरावा, निर्माण होऊ शकतो वास्तू दोष

Vastu Tips For Photos : वास्तुशास्त्रानुसार ह्या गोष्टींमध्ये काही अशी फोटो कारणीभूत आहेत, जी चुकूनही आपण घरात लावली नाही पाहिजे. ह्या फोटोमुळे घरातील लोकांना त्याचा तोटाच होतो. अशे कोणते फोटो आहेत ते पुढील प्रमाणे पाहणार आहोत.

Vastu Tips For Photos : जीवनात माणसाला अनेक वेळा विनाकारण अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आर्थिक अडचण, नात्यात दुरावा, घरातील चिंता व तणाव, घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढणे इत्यादी स्वरूपाच्या समस्या येतात. वास्तुशास्त्रानुसार ह्या गोष्टींमध्ये काही अशी फोटो कारणीभूत आहेत, जी चुकूनही आपण घरात लावली नाही पाहिजे. ह्या फोटोमुळे घरातील लोकांना त्याचा तोटाच होतो. अशे कोणते फोटो आहेत ते पुढील प्रमाणे पाहणार आहोत.

मावळत्या सूर्याचा फोटो :

वास्तु सल्लागार सांगतात की, वास्तुशास्त्रानुसार मावळत्या सूर्याचे फोटो चुकूनही घरात कोणत्याही ठिकाणी लावू नये. हे एक प्रकारचे अशुभ चित्र समजले जाते, ज्यामुळे तुमच्या यशावर नकारात्मक गोष्टींचा परिणाम दिसू शकतो.

रडणाऱ्या बाळाचे फोटो :

वास्तुशास्त्रानुसार घरात रडणाऱ्या बाळाचे चित्र चुकूनही लावू नये. अशा फोटो मुळे घरातील सकारात्मक ऊर्जेचा संचार संपतो, आणि घरातील सदस्यांना दुर्दैवाला सामोरे जावे लागते, याशिवाय कुटुंबातील सदस्यांमधील वाद विवाद दिवसेंदिवस वाढतच राहतात.

शिकारी प्राण्यांची फोटो :

वास्तुशास्त्रात सांगितले आहे की घरात शांतता आणि तणावपूर्ण वातावरण टाळण्यासाठी नेहमी शिकारी प्राण्यांचे फोटो लावणे टाळावे. असे न केल्याने घरात नकारात्मकता वाढते आणि वातावरण तणावपूर्ण बनते.

वाहत्या पाण्याचे फोटो :

वास्तुशास्त्रानुसार वाहत्या पाण्याचे फोटो कधीही घरात लावू नये. हे फोटो अशुभ ऊर्जा आणते आणि पैशाचे नुकसान वाढवू शकते. कुटुंबातील सदस्यांनी कितीही पैसा कमावला तरी तो पैसा घरात राहत नाही आणि उत्पन्नाचे साधनही कमी होऊ लागते. असे फोटो पोस्ट करणे टाळलेले बरे.

बुडणाऱ्या किंवा स्थिर होडीचे फोटो :

वास्तुशास्त्रानुसार बहुतेक लोक घराच्या सजावटीसाठी बुडणाऱ्या किंवा स्थिर बोटीचे फोटो, चित्रे, लावतात, हे करणे टाळा पाहिजे. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार सांगतात की, बुडलेल्या, तुटलेल्या किंवा रखडलेल्या बोटीचे किंवा जहाजाचे फोटो घरात कधीही लावू नये. ही चित्रे लावल्याने घरात आणि जीवनात अडचणी वाढू लागतात. दु:खाने घेरले जाऊ शकते.

Follow us on

Sharing Is Caring: