Lahsun che Upay : ज्योतिष शास्त्रानुसार, आपल्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्या अनेक गोष्टी आपल्या जेवणाची चव तर वाढवत असतातच पण त्यापासून काही खास उपाय केल्याने आपण श्रीमंत देखील होऊ शकतो. ज्योतिष शास्त्रात प्रत्येक गोष्टीचे विशेष महत्त्व, उपयोग आणि परिणाम सांगितला आहे. लसूण ही आपल्या स्वयंपाकघरात वापरली जाणारी एक गोष्ट आहे. लसणाचे असे काही उपाय आहेत, जे तुमच्या घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करू शकते.
समृद्धीसाठी
सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही जर तुमची आर्थिक स्थिती सुधारत नसेल आणि तुमच्या घरात समृद्धी येत नसतील तर शनिवारी तुम्हाला लसणाची एक पाकळी जवळ ठेवावी आणि तुम्ही कुठेही जाल तर सोबत घेऊन जावे. असे केल्याने आर्थिक हानी कमी होते आणि समृद्धी मिळते असे मानले जाते.
Vastu Tips: आजारपण सोडत नाही तुमची पाठ, तर करून बघा हे उपाय, आजारपण जाईल पळून
व्यापार वृद्धीसाठी
जर तुम्ही व्यापारी वर्गाशी संबंधित असाल आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायात सतत नुकसान होत असेल तर लाल कपड्यात लसणाच्या 5 ते 7 पाकळ्या बांधून तुमच्या दुकानाच्या किंवा ऑफिसच्या मुख्य दारावर लटकवा, असे मानले जाते की असे केल्याने तुम्ही तुमच्या व्यवसायात नफा मिळू लागेल.
घरात सुख शांती राखण्यासाठी
जर तुमच्या घरात सुख-शांती नसेल आणि दररोज ग्रह क्लेश होत असेल तर मंगळवार आणि शनिवारी एका काठीला लसणाच्या 7 कळ्या बांधा आणि घराच्या अंगणात आणि गच्चीवर ठेवा. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते असे मानले जाते. दर मंगळवार आणि शनिवारीच हे काम पुन्हा करा.
मुले नेहमी आजारी पडत असतील तर
जर तुमच्या घरातील मुले वारंवार आजारी पडत असतील तर ते दृष्टीदोषामुळे होत आहे. तुम्ही त्याच्या संपूर्ण शरीरावर लसूण 7 वेळा उतरवा आणि 5 लाल मिरच्यांसोबत जाळून टाका. या प्रयोगाने दृष्टीदोष दूर होईल आणि मुलांमध्ये असलेले नकारात्मक परिणाम संपतील.