सूर्यग्रहण (Solar Eclipse December 2021) : वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण ४ डिसेंबर रोजी होणार आहे. हे संपूर्ण सूर्यग्रहण असेल जे ऑस्ट्रेलिया, बोत्सवाना, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, दक्षिण जॉर्जिया, नामिबिया, मादागास्कर आणि तस्मानियामध्ये दिसेल.
पंचांगानुसार हे ग्रहण मार्गशीर्ष महिन्यातील अमावास्येला वृश्चिक आणि ज्येष्ठ नक्षत्रात होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही, पण सर्व राशीच्या लोकांवर याचा परिणाम होईल. येथे तुम्हाला कळेल की कोणत्या 4 राशींसाठी हे ग्रहण शुभ ठरणार आहे.
मिथुन: या राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण फायदेशीर ठरेल. नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या शत्रूंना मागे टाकाल. कोर्ट केसेसमध्ये विजयाची आशा राहील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. जीवनातील अनेक संकटे संपतील अशी अपेक्षा आहे. काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.
कन्या : या राशीच्या लोकांसाठीही ग्रहण शुभ राहील. तुमचा उत्साह वाढेल. जीवनाच्या अनेक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. घरामध्ये कुटुंबीयांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मेहनतीचे योग्य फळ मिळताना दिसते.
मकर : उत्पन्न वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. उत्पन्नाचे मार्ग खुले होतील. करिअरमध्ये मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरी मिळू शकते. पगारात लक्षणीय वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
कुंभ : या राशीच्या लोकांसाठीही ग्रहण शुभ दिसत आहे. तुमच्या प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. उत्पन्न वाढेल.
या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ग्रहण चांगले मानले जात नाही. आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. वृषभ राशीच्या लोकांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
मेष राशीच्या लोकांना त्यांच्या मान सन्मानाची काळजी घ्यावी लागेल. कोणीही नाराज करू शकतो. धनु राशीच्या लोकांना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. हॉस्पिटल भेटी होऊ शकतात.