Vastu Tips: पती-पत्नीच्या झोपण्याची योग्य दिशा कोणती, या 5 गोष्टींची घ्या विशेष काळजी

Vastu Tips For Bedroom: प्रत्येक नात्यात प्रेम, आदर आणि सन्मान ठेवल्याने ते टिकते. नातं टिकून ठेवण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. वास्तू शास्त्रानुसार विवाहित जोडप्यासाठी काही नियम आहेत ज्यांचे पालन केल्याने नाते अजून चांगले होईल.

Vastu Tips For Bedroom: तुम्ही बहुतेक वेळा बघितले असेल कि, लोक कोणत्या हि दिशेला झोपतात. चुकीच्या दिशेला झोपल्याने त्यांच्या जीवनात काही अडचणी, संकट येतात पण त्यांच्या हे लक्षात येत नाही. विशेषतः विवाहित जोडप्याने चुकीच्या दिशेने झोपल्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात भांडण सुरु होतात.

वास्तू शास्त्रात दिशेला विशेष महत्व दिले गेले आहे. काही वेळेस घरात वास्तू दोष पहिलेच असतो, किंवा काही कारणाने तो दोष निर्माण होतो. वास्तू शास्त्रानुसार पती पत्नीने झोपताना काही गोष्टीची काळजी घेतली तर त्यांच्या वैवाहिक जीवनातील समस्या स्वतःहूनच नष्ट होतील. वास्तू शास्ताच्या नियमानुसार झोपल्याने त्यांच्या संबंधात सुधारणा होईल. पती पत्नी मध्ये योग्य ताळमेळ राहील. त्यामुळेच पती पत्नीने कोणत्या दिशेला झोपावे ते सुचवले आहे.

हे पण वाचा: Vastu Tips: चुकून देखील लावू नका हे ५ फोटो; नात्यात येऊ शकतो दुरावा, निर्माण होऊ शकतो वास्तू दोष

बेडरूमची दिशा

वास्तू शास्त्रानुसार जर विवाहित जोडप्याने आपले बेडरूम बनवले तर त्यांचे नाते नेहमी मजबूत राहते. विवाहित जोडप्याने त्यांचे बेडरूम वास्तू शास्त्रानुसार दक्षिण-पश्चिम दिशेला बनवले पाहिजे. जर समजा जोडपे नवविवाहित असेल आणि आई वडिलांसोबत राहत असतील तर बेडरूम उत्तर-पश्चिम दिशेला असावे. वास्तू शास्त्रानुसार विवाहित जोडप्याचे बेडरूम उत्तर पूर्व दिशेला नसावे. हि दिशा विवाहित जोडप्याचे स्वास्थ प्रभावित करते.

हे पण वाचा : Vastu Tips: घरात वाढेल पैसा आणि मिळेल कर्जातून मुक्ती; करून बघा ह्या टिप्स

बेडची दिशा 

वास्तू शास्त्रानुसार विवाहित जोडप्याचे बेड रूमच्या दक्षिण-पश्चिम भिंतीला चिटकून असले पाहिजे. विवाहित जोडप्याच्या बेड समोर कोणताही दरवाजा ह्या गोष्टीची काळजी घ्या. वास्तू शास्त्रानुसार विवाहित जोडपे डोकं दक्षिण, दक्षिण पूर्व किंवा दक्षिण-पश्चिम कडे करून झोपावे. झोपताना डोकं उत्तर दिशे कडे करून बिलकुल झोपू नये, असे केल्याने तुम्ही तणावग्रस्त किंवा निरुत्साही राहाल.

विवाहित जोडप्यासाठी काही इतर टिप्स

विवाहित जोडप्याने नेहमी काळजी घेतली पाहिजे कि, ज्याठिकाणी त्यांचा बेड ठेवला आहे त्याच्या वरून क्रॉस करणारा पिलर नसावा. तसेच बेडच्या एकदम वरती लाईट लावलेली नसावी.

विवाहित जोडप्याने प्रयत्न करावा कि, बेडरूम मध्ये इलेक्ट्रॉनिक गेजेट्स जसे कि लैपटॉप, मोबाइल फोन, चार्जर इत्यादी ठेवू नये.

विवाहित जोडप्याने झोपताना डोकं योग्य दिशेला राहील ह्याची काळजी जरूर ठेवावी. त्यांनी त्यांचा बेड असा ठेवावा कि, झोपताना त्यांचे डोकं दक्षिण दिशेला राहील.

Follow us on

Sharing Is Caring: