Money Plant Vastu Tips : काही लोकांचा असा विश्वास आहे कि, मनी प्लांट (Money plant) लावल्याने घरात सुख-समृद्धी (Prosperity) येते, आर्थिक प्रगती होते. त्यामुळे काही लोक आवडीने कानी प्लांट लावतात. परंतु काही लोकांचे मनी प्लांट खूप वाढलेले असते, तरी देखील त्यांची प्रगती होत नाही असा त्यांचा अनुभव असतो. वास्तुशास्त्रानुसार (Vastu Shastra) त्यामागचे कारण समजून घेणे आवश्यक आहे.
वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट (Money plant) लावताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही त्या गोष्टींची काळजी घेतली तर तुमच्या हि घरात सुख-समृद्धी राहील आणि आर्थिक प्रगती होईल. चला तर मग माहिती करून घेऊया त्याबद्दल पुढील प्रमाणे.
योग्य दिशेला लावा:
मनी प्लांट लावल्या नंतर त्यांचा तुम्हाला लाभ व्हावा अशी तुमची इच्छा असेल तर मनी प्लांट लावताना ते योग्य दिशेला लावण्याची काळजी घ्या. वास्तुशास्त्रानुसार आग्नेय कोपरा म्हणजे दक्षिण पूर्व मध्यभागी मनी प्लांट लावणे शुभ समजले जाते. त्यामुळे घरात सुख समृद्धी कायम राहील.
स्थान देखील महत्त्वाचे आहे
बहुतेक लोक आपल्या घराच्या छतावर, गॅलरीमध्ये किंवा लॉनमध्ये मनी प्लांट लावतात. वास्तुशास्त्रानुसार घरात अशाच ठिकाणी मनी प्लांट लावल्याने शुभ फळ प्राप्त होतात. झाडाला मोकळी जागा आणि पुरेसा प्रकाश मिळेल ह्याची काळजी घ्या. मनी प्लांट जेवढ्या जोमाने वाढेल तेवढ्याच जोमाने तुमची आर्थिक प्रगती होऊ शकते.
मनी प्लांटची वाढ
मनी प्लांट लावल्या नंतर ते बहुतेक घरात खालच्या बाजूने वाढते, म्हणजेच मनी प्लांटची वेल खाली खाली येते. मनी प्लांट हा नेहमी वरच्या बाजूने वाढत राहिला पाहिजे त्यामुळे, मनी प्लांटची वेल लावल्या नंतर ती वरच्या बाजूने वाढत राहील ह्याची काळजी घ्या. तिला वेळो वेळी वरच्या बाजूने सरकवत राहा. मनी प्लांट वरच्या बाजूने वाढल्याने तुमची संपत्ती देखील वाढत राहणार आहे.
अशा प्रकारे मनी प्लांट लावा
काही गोष्टींची काळजी मनी प्लांट लावताना घेतली पाहिजे. अशी मान्यता आहे कि, निळ्या किंवा हिरव्या रंगाच्या काचेच्या बाटलीत मनी प्लांट लावणे शुभ आहे. घरात संपत्ती वाढू लागेल. परंतु जर तुम्ही ते कुंडीत लावणार असाल तर ते मोठ्या कुंडीत लावा. कारण मनी प्लांटला वाढायला चांगली जागा मिळेल.