Money Plant Vastu Tips : काही लोकांचा असा विश्वास आहे की मनी प्लांट लावल्याने तुम्हाला नशीब मिळू शकते. तथापि, मनी प्लांट लावण्याचे काही तोटे देखील आहेत, ज्याची आपण आज चर्चा करणार आहोत. वास्तुशास्त्र म्हणजे घराची रचना आणि व्यवस्था करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा संच. त्यामध्ये झाडे, वनस्पती, प्राणी आणि पक्षी तसेच घरातील फर्निचर, खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंची माहिती समाविष्ट असते.
मनी प्लांट (Money Plant) लावण्याचे फायदे :
- वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मनी प्लांट लावल्याने सुख, समृद्धी आणि संपत्ती वाढते.
- घराच्या आग्नेय कोपऱ्यात मनी प्लांटसाठी सर्वोत्तम स्थान आहे. या दिशेने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आग्नेय दिशेतील कोणतेही दोष दूर होतात. आग्नेय दिशेचे प्रतिनिधी श्रीगणेशाला मानले जाते.
- काही लोकांची अशी मान्यता आहे कि, मनी प्लांट शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र कमजोर असेल तर त्याने घराच्या आग्नेय दिशेला मनी प्लांट लावावा.
Vastu Tips : घरामध्ये आर्टिफिशियल ग्रास किंवा प्लांट ठेवली असेल तर विशेष गोष्टींची काळजी घ्यावी
मनी प्लांट (Money Plant) लावण्याचे नुकसान
- जर तुम्ही तुमचा मनी प्लांट चुकीच्या ठिकाणी लावला तर तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
- जर मनी प्लांट खालच्या दिशेने वाढला तर ते भाग्यवान मानले जात नाही, परंतु जर ते वरच्या दिशेने वाढले तर ते भाग्यवान मानले जाते.
- तुमचा मनी प्लांट दुसऱ्याला देऊ नका. असे केल्यास तुमच्या घरातील आशीर्वाद निघून जातील.
चोरी करून मनी प्लांट (Money Plant) लावणे
तुम्ही काही लोकांच्या तोंडून ऐकले असेल कि, दुसऱ्याच्या घरातून मनी प्लांट चोरी करून आपल्या घरी लावल्यास त्याचे शुभ फळ मिळते, त्याने धन आकर्षित होऊन आर्थिक प्रगती होते. पण वस्तू सल्लगार लोकांच्या मते, ह्यात गोष्टीत काही तथ्य नाही. वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट कधीही काचेच्या बाटलीत लावू नये.