Dream Science / Swapna Shastra: प्रत्येकाला झोपल्या नंतर काही स्वप्न येत असतात, ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु आपल्याला येणारी सर्वच स्वप्न आपल्या लक्ष्यात राहत नाही. काही काही स्वप्न आपल्या लक्ष्यात राहतात. साधारणतः अशी स्वप्न आपल्याला भविष्यात होण्याऱ्या घटनांचे संकेत देतात. काही स्वप्न हि शुभ असतात तर काही अशुभ असतात.
बहुतेक वेळेस तुम्ही बघितले असेल कि, लोक त्यांना आलेल्या स्वप्नांविषयी इतरांना सांगत असतात. कधी कधी स्वप्नातील घटना खूप चांगल्या असतात किंवा वाईट त्यामुळे ती आपण इतरांसोबत शेअर करतो. परंतु असे करणे काही वेळेस योग्य नाही. खरे तर काही स्वप्न अशी असतात जी कोणासोबत हि शेअर करणे टाळले पाहिजे. चला तर माहिती करून घेऊया कि, अशी कोणती ५ स्वप्न आहेत ज्यांना गुप्त ठेवणेच फायद्याचे आहे.
स्वप्नात स्वतःचा मृत्यू
स्वप्नात स्वतःचा मृत्यू दिसणे हे स्वप्न शास्त्रानुसार शुभ समजले जाते, अशी स्वप्न कोणास हि सांगू नये. असे केल्याने तुमच्या घरात येणाऱ्या आनंदाचे संकेत मिळतात. काही वेळेस तुमच्या येणाऱ्या आनंदाला कोणाची वाईट नजर लागू शकते. त्यामुळे ते न सांगणेच फायद्याचे राहील.
आई वडिलांना पाणी देताना
जर तुम्ही स्वप्नात स्वतःला तुमच्या आई-वडिलांना पाणी देताना दिसले तर हे स्वप्न देखील कोणाशीही शेअर करू नये. या प्रकारची स्वप्ने तुमच्या जीवनातील प्रगतीशी संबंधित आहेत. अशी स्वप्ने कोणाशीही शेअर केल्याने तुमच्या प्रगतीला बाधा येऊ शकते. त्यासाठी हे स्वप्न न सांगणे चांगले राहील.
Chanakya Niti: मुलींना आवडतात अशी मुले, स्वतः लागतात त्यांच्या मागे आणि करायचे असते हे काम
चांदीचा भरलेला कलश दिसणे
जर तुम्हाला स्वप्नात चांदीने भरलेला कलश दिसला तर ते शुभ आहे असे समजे. तुमच्या वर माता लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद असून तुमच्या वर तिची कृपा होण्याचे संकेत आहेत. स्वप्न शास्त्रानुसार जर तुम्ही ह्या स्वप्न बद्दल कोणास काही सांगितले तर लक्ष्मी मातेची कृपा होत नाही. त्यामुळे चुकून देखील हे उत्साहात कोणास सांगायला जाऊ नका.
स्वप्नात देवाने दर्शन दिले
काही लोकांना कधी कधी देवाचे दर्शन स्वप्नात होते. ह्याचा अर्थ असा आहे कि, तुमच्या वर देवाची कृपा होणार असून तुम्हाला नोकरी किंवा कार्यक्षेत्रांत लवकरच चांगली खुशखबर मिळणार आहे. स्वप्न शास्त्र अशी स्वप्न कोणाला सांगू नका.
फळ बाग
जर स्वप्नात फळ बाग दिसली असेल तर ते शुभ संकेत समजावे. लवकरच तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण येणार आहे असे समजा. म्हणून ते स्वप्न कोणाला सांगून नका नाही तर अशुभ फळ मिळेल.