Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनीही मानवी जीवनाविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्यांचे पालन केले तर जीवनात भरपूर यश मिळू शकते. चाणक्यांच्या मते जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला न्याय देऊ शकता तर तुम्ही जीवनात कधीही पराभूत होणार नाही. याशिवाय आचार्य सांगतात कि, जीवनात 3 प्रकारच्या लोकांपासून नेहमीच दूर असावे.
मनुष्य जेव्हा जन्म घेतो तेव्हा तो काहीही बघू शकत नाही, त्याच प्रकारे वासना, क्रोध आणि नशा या विकारांनी ग्रासलेल्या माणसाला दुसरे काही दिसत नाही.
स्वार्थी लोकांपासून रहावे दूर
आचार्य चाणक्य सांगतात कि, मनुष्याने नेहमी स्वार्थी लोकांपासून दूर राहायला पाहिजे.स्वार्थी माणूस देखील इतरांचे दोष बघू शकत नाही. स्वार्थी लोकांशी कधीही मैत्री करू पण नये आणि ठेवू देखील नये. स्वार्थी माणूस तुम्हाला कधी हि अडचणीत आणू शकतो. त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ महत्वाचा असतो.
रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत त्यांच्या पासून दूर राहा
आचार्य चाणक्य म्हणतात कि, ज्या व्यक्तीला स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही त्याच्या पासून दूर राहण्यातच फायदा आहे. रागामुळे योग्य अयोग्य समजण्याची शकता नसते त्यामुळे असे लोक तुमच्यासाठी नेहमी समस्या निर्माण करू शकतात.
लोभी माणसा पासून दूर रहा
चाणक्य नीती या ग्रंथात चाणक्य लिहितात कि, मनुष्याने नेहमी लोभी आणि मत्सरी माणसापासून दूर राहावे. असे लोक स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात. हे लोक कधीच दुसऱ्याचे भले बघू शकत नाही.