Chanakya Niti : आचार्य चाणक्यांनी अशी काही नीती सांगितल्या आहेत ज्यांचा अवलंब केल्याने सर्व सामान्य माणसाचे जीवन सुखमय होऊ शकते. आजच्या आधुनिक युगात प्रत्येकाला वाटते कि, आपण सर्वच कामात सर्वोत्तम असावे. परंतु आपल्यानं सर्वच क्षेत्रातील कामांची माहिती किंवा ज्ञान असेलच असे नाही, त्यामुळे काही वेळेस अपेक्षित परिणाम मिळत नाही. आपला वेळ आणि पैसे खर्च होतो आणि परिणाम शून्य.
आचार्य चाणक्यांनी नोकरी आणि व्यवसाय करण्याऱ्या प्रत्येकासाठी काही नियम सांगितले (Chanakya Niti) आहे, जर त्यांचा वापर केला तर ते आपल्या क्षेत्रात रात्रंदिवस चौपट प्रगती करून यशस्वी होतील.
कामाच्या बाबतीत गंभीर असणे
चाणक्य सांगतात कि, देवाने मनुष्यात काम करण्याची गुणवत्ता दिली आहे, त्यामुळे मनुष्याने कोणत्याही परिस्थितीत काम करण्यापासून दूर राहू नये. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. तुम्ही जे काम करता त्यामध्ये पूर्ण समर्पित राहून काम करा आणि हे समर्पित असणेच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे आणि विशेष बनवते.
चाणक्य पुढे असे सांगतात कि (Chanakya Niti), तुम्ही जे काम करता ते जर तुम्ही मना पासून नाही केले, नालाईज म्हणून केले तर त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता कमी असते. म्हणूनच कामात आळस येऊ देऊ नका. उत्साहाने सर्व कामे वेळेत पूर्ण करा त्याचा तुम्हाला भविष्यात लाभ होईल. जर तुम्ही कामात गंभीर नसाल तर तुमचे वर्तमान आणि भविष्य दोन्ही धोक्यात राहील.
Chanakya Niti: मुलींना आवडतात अशी मुले, स्वतः लागतात त्यांच्या मागे आणि करायचे असते हे काम
आंधळा विश्वास धोक्याचा
चाणक्याच्या मते, तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यापार करत असाल तर तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रातील रणनीती किंवा गुपित कधी हि सर्वांसोबत शेअर करू नका. कोणतीही व्यक्ती तुमच्या किती हि जवळची असली तरी त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवण्याची चूक करू नका.
कारण हाच आंधळा विश्वास तुम्हाला गोत्यात आणू शकतो. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांवर विश्वास ठेवणे जरुरी आहे, पण कोणा वर हि, डोळे जाकुन विश्वास ठेवला तर तुमची कोणत्या हि क्षणी फसवणूक होऊ शकते.
एक चुकीचे पाऊल तुम्हाला कंगाल करू शकते
आचार्य चाणक्य सांगतात कि, बहुतेक वेळेस लोक आपला व्यवसाय वाढवण्यासाठी, अधिक धन मिळवण्याच्या हव्यासा पायी चुकीचा मार्ग अवलंब करतात. अशा मार्गाने त्यांना झटपट आणि तात्पुरता आनंद मिळू शकतो, परंतु हा पैसा भविष्यातील तुमचा आनंद, शांती आणि संपत्ती हिसकावून घेईल. त्यामुळे अशा संपत्तीच्या मागे लागू नये, ज्यामुळे तुम्हाला कठोर यातना सहन कराव्या लागू शकतात. अशा संपत्तीमूळे तुम्हाला तुमच्या नैतिकतेचा आणि मूल्यांचा त्याग करावा लागू शकतो.
तुमचा एखादा चुकीचा निर्णय, चुकीचे पाऊल तुमची किंवा तुमच्या उत्पादनाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. अशाने तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते आणि तुम्ही कंगाल होऊ शकता. त्यामुळे प्रामाणिक मार्गाने आणि विचारपूर्वक निर्णय घेतल्याने मानसिक समाधान मिळते आणि मिळालेल्या संपत्तीत वृद्धी होते.