Chanakya Niti: आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येकजण एक चांगला जीवनासाठी शोधत असतो. स्त्री आणि पुरुष दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवायला हवा मग ते लग्ना नंतरच जीवन असो किंवा प्रेमजीवन. तुमच्या तुमच्या जोडीदारावर तुमचा विश्वास निर्माण झाला तर समजून घ्या कि, तुम्हाला एक चांगला जीवनसाथी मिळाला आहे. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये या विषयी अनेक व्यावहारिक ज्ञान दिले आहे. चाणक्य नीती मध्ये आचार्यांनी स्त्रियांना कसे पुरुष आवडतात त्याबद्दल माहिती सांगितली आहे.
स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी पुरुषांमध्ये कोणते गुण असावे त्याबद्दल चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे. आचार्य चाणक्य सांगतात कि, पुरुषांच्या ह्या गुणांमुळे स्त्रिया आनंदी राहतात आणि अशा पुरुषा पासून त्या दूर जाण्याचा विचार देखील करू शकत नाही. चला तर माहिती करून घेऊया त्या गुणांबद्दल ज्यामुळे कोणती हि स्त्री अशा पुरुषाकडे आकर्षित होते.
सीक्रेट नेहमी सीक्रेट ठेवतात :
आचार्य चाणक्य असे सांगतात कि, स्त्रियांना असे पुरुष आवडतात जे आपल्या जोडीदाराचे सीक्रेट कोणा सोबत हि शेअर करत नाही. स्त्रिया अशा पुरुषांवर आपला जीव देखील ओवाळून टाकायला तयार असतात. आपल्या जोडीदाराचे सीक्रेट नेहमी गुप्त ठेवणारे पुरुष स्त्रियांना खूप प्रिय असतात. स्त्रियांना हा गुण असलेला पुरुष आपल्या आयुष्यात कायमचा ठेवायचा असतो, अशा पुरुषावर त्या खूप प्रेम करतात.
Vastu Tips: साफ सफाई करताना हे नियम लक्षात ठेवले तर कायम राहील घरात माता लक्ष्मीचा वास
मान सन्मान देणारे पुरुष :
महिलांची नेहमीच अशी इच्छा असते कि, पुरुषांनी आपल्या इज्जतीला धक्का लावू नये. असा पुरुष जो स्त्रीला मान देतो तिच्या सन्मानाची काळजी घेतो तो पुरुष स्त्रियांना खूप आवडतो. अशा पुरुषाकडे स्त्रिया नेहमीच आकर्षित होतात. जर एखादा पुरुष स्त्रीला मान देत नाही, तिच्या सन्मानाची काळजी घेत नाही त्या पुरुषापासून स्त्रिया अंतर ठेवून राहतात, त्याच्या पासून दूर राहतात. त्यांना अशा पुरुषा सोबत संबंध ठेवायला आवडत नाही.
स्वातंत्र्या देणारा पुरुष :
आचार्य चाणक्य सांगत कि, स्त्रियांना त्यांचे स्वातंत्र्य खूप आवडते. जो पुरुष स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा आदर करतो, स्त्रियांना त्यांचे जीवन जगण्याचे स्वातंत्र्य देतो अशा पुरुषाला त्या आपला सर्वोत्तम जोडीदार समजतात. पुरुषाने स्त्री वर कोणते हि बंधन घालू नये, तिच्या वर संशय घेऊ नये, तिला तिच्या मना प्रमाणे मुक्तपणे जीवन जगू देणे म्हणजे स्वातंत्र्य स्त्रियांना अपेक्षित असते. असे स्वातंत्र्य ज्या पुरुषाकडून मिळते त्या पुरुष सोबत ते आयुष्य घालवण्याचा विचार करतात.
Vastu Tips: घरातील देवघरात या ३ मूर्ती कधी हि ठेवू नये; नाही तर वास्तुदोष निर्माण होईल
अहंकाराला न करणारा पुरुष :
अहंकारी पुरुष कधीच महिलांना आवडत नाही. बढाई मारणाऱ्या पुरुषापासून स्त्रिया अंतर ठेवणे पसंद करतात. अहंकारी पुरुष कधी हि चांगला जीवनसाथी होऊ शकत नाही असे स्त्रियांचे मत असते. स्त्रियांना नम्र स्वभावाचे, प्रामाणिक, बढाई न मारणारे पुरुष आपला जीवनसाथी म्हणून पाहिजे असतात.