Breaking News

8 एप्रिल 2022 रोजी बुध ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे, या काळात भरपूर प्रगती होईल

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका निश्चित वेळेत राशी बदलतो. याचा सर्व राशींवर परिणाम होतो. ग्रहांचा राजकुमार म्हटला जाणारा बुध ग्रह उद्या म्हणजेच 8 एप्रिल 2022 रोजी राशी बदलत आहे.

बुध मेष राशीत भ्रमण करत आहे. धन, बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, व्यवसायाचा कारक असलेल्या बुध ग्रहाचा मेष राशीतील प्रवेश 4 राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे.

मिथुन : बुधाचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. त्यांना पैसा मिळेल. उत्पन्न वाढेल आणि कमाईचे नवीन मार्गही उघडू शकतात. करिअर, व्यवसायात चांगले यश मिळू शकते. नवीन काम सुरू करू शकता. गुंतवणुकीसाठीही चांगला काळ आहे.

कर्क : बुध ग्रहाचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन नोकऱ्या घेऊन येऊ शकते. बेरोजगारांनाही काम मिळू शकते. पदोन्नती-वाढ मिळण्याचीही दाट शक्यता आहे.

व्यापाऱ्यांना मोठा नफा होऊ शकतो. त्यांना मोठ्या ऑर्डर मिळू शकतात. एकूणच, हा काळ प्रगती, पैसा, मान-सन्मान सर्वकाही घेऊन येईल. शत्रूवरही विजय प्राप्त होईल.

मीन : बुधाचे संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी भरपूर धन मिळवून देईल. त्यांना अशा ठिकाणाहून पैसे मिळतील, ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. थांबलेले पैसेही मिळतील. करिअर, व्यवसायात फायदा होईल. विशेषत: मीडिया, मनोरंजन उद्योग आणि वकिलीशी संबंधित लोकांसाठी हा काळ वरदानाचा आहे.

About Leena Jadhav