Breaking News

बऱ्याच दिवसापासून पत्नीला भेट दिली नाही, ह्या 3 भेटीमूळे तुमची पत्नी पुन्हा एखादा तुमच्या प्रेमात पडेल

रिलेशनशिप टिप्स (Relationship Tips) : कोणाला आपल्या पत्नीला आनंदी ठेवायचे नसते? परंतु बरेचदा असे होते की तुमचे बजेट विस्कळीत होते आणि तुम्हाला इच्छा असूनही तुम्ही तुमच्या पत्नीसाठी कोणतेही गिफ्ट देऊ शकत नाही. ही गोष्ट तुम्हाला आतून खूप त्रास देते आणि तुम्हाला असे वाटू लागते की तुम्ही तुमच्या पत्नीसाठी इतके ही करू शकत नाही.

जर तुम्हीही असाच विचार करत असाल तर जाणून घ्या तुमच्या जोडीदाराला खास वाटण्यासाठी तुम्ही रूम भेटवस्तूंनी भरलीच पाहिजे असे नाही, इतरही अनेक मार्ग आहेत ज्यामुळे तुमच्या पत्नीला स्पेशलच नाही तर तुम्‍ही तिला खूश करण्‍याचा किती प्रयत्‍न करता ह्याची देखील जाणीव होईल.

चला तर पाहूया असे तुमची काय करू शकता ज्यामुळे तुमच्या पती पत्नीच्या नात्यामधले प्रेम अजून वाढेल आणि तुमचं नाते आणखी मजबूत होईल.

वेळे पेक्षा मोठे गिफ्ट नाही : जर तुम्हाला तुमच्या पत्नीला ती तुमच्यासाठी किती स्पेशल आहे ह्याची जाणीव करून द्यायचे असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेळेपेक्षा मोठी भेट देऊ शकत नाही हे समजून घ्या.

तुमच्या पत्नीला स्पेशल वाटण्यासाठी, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या ऑफिस मधून एक दिवस सुट्टी घ्या, त्यानंतर तुम्ही तिला एका सुंदर पार्कमध्ये किंवा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी घेऊन पिकनिकची योजना करू शकता. माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या पत्नीसाठी यापेक्षा मोठी भेट असू शकत नाही.

एके दिवशी बायकोला कामातून सुट्टी द्या : तुमच्या बायकोला स्पेशल वाटावं म्हणून तुम्ही असंही करू शकता की सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत तिला चहाही करू देऊ नका. त्यादिवशी तिला राजकन्या किंवा राणी सारखे वाटावे आणि तिला आरामात बसून चित्रपट पाहू द्या घरातील सर्व कामाची जबाबदारी एक दिवस तुमची घ्या.

तुमचे हे सरप्राईज त्यांच्या मनाला आवडले नाही तर त्यांना सांगा. आपल्या पतीने आपल्यासाठी एवढं काही केले किंवा तिला स्पेशल वाटावं म्हणून जी मेहनत घेत आहे ते पाहून त्या तुमच्या आणखीनच प्रेमात पडतील. तुमचा हा रोमँटिक अंदाज पाहून त्या खूप आनंदी होतील.

पत्राचा खूप उपयोग होतो : असं म्हणतात की मुली छोट्या छोट्या गोष्टींनी आनंदी होतात आणि जर तुम्हाला तुमच्या बायकोला स्पेशल वाटायचं असेल तर तुम्ही तिला प्रेमपत्र लिहू शकता. ज्यामध्ये तुम्ही तिला तुमच्यासाठी आहे याची जाणीव करून द्या.

तिचे प्रेम तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे आणि तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या शेवट पर्यंत दररोज सकाळी सूर्य उगवताना आणि संध्याकाळचा सूर्यास्त तिच्या सोबतच पाहायचा आहे ह्या बद्दल रोमँटिक अंदाजात लिहा.

माझ्यावर विश्वास ठेवा, या त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्यांच्या समोर सर्वात महागडे गिफ्ट ही फिके पडले आहे. हल्लीच्या काळात मोबाईल मुळे, कामामुळे एकमेकांना पुरेसा वेळ न दिल्याने, प्रेम प्रकट न केल्याने दुरावा निर्माण झाला आहे तो दूर करण्यास मदत होईल.

About Chhaya V

दररोज आम्ही नवीन आणि आपल्या आवडीस येईल अशी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. आपणास जर आमचा हा प्रयत्न आवडला तर आम्हाला फेसबुक वर फॉलो करा.