“A” Letter Name Personality: ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचे त्याच्या जन्म कुंडली वरून त्याचे भाग्य, स्वभाव, चरित्र इत्यादींचा अंदाज वर्तवून भाग्य सांगितले जाते त्याप्रमाणे व्यक्तीच्या पहिल्या अक्षरावरून देखील व्यकितचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव याविषयी भाष्य करता येते.
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक अक्षराची स्वतःचे विशेष गुण असून त्यांची प्रत्येकाची विशिष्ट अशी ऊर्जा असते, त्याच्या सहाय्याने व्यक्तीच्या एकुणच व्यक्तिमत्व विषयी गोष्टी सांगता येऊ शकतात. आम्ही आपणास इंग्रजी अक्षर “A” ने ज्या व्यक्तींचे नाव सुरू होते त्यांच्या स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वा बद्दल सांगत आहेत.
मेहनती आणि धैर्यवान असतात:
इंग्रजी वर्णमालेतील सर्वात पहिले अक्षर “A” असून ज्या व्यक्तींचे नाव “A” पासून सुरु होते त्याव्यक्ती मानसिक रूपाने खूप मजबूत असतात. कोणत्याही कठीण परिस्तिथीत न घाबरता न डगमगता परिस्तिथीतला सामोरे जातात आणि मार्ग काढतात. ह्या व्यक्ती खूप महेनती आणि धैर्यवान देखिल असतात. ह्या व्यक्ती कोणत्या हि परिस्तिथीत लवकर स्वतः वरचा ताबा सोडत नाही.
करिअर:
“A”अक्षराने ज्याव्यक्तीचें नाव सुरु होते त्यांच्या मध्ये भरपूर आत्मविश्वास असतो. या व्यक्तींना स्वतःच्या अटी शर्तींवर जीवन जगणे आवडते. करिअरमध्ये या व्यक्ती व्यापारी, उद्योगी, शिक्षक, संशोधक किंवा अशाच प्रकारच्या नेतृत्व करू शकणारी कामे चांगल्या प्रकारे करू शकतात. “A” अक्षरवाल्या व्यक्तींमध्ये जन्मजात नेतृत्व गुण असतात.
परिस्तिथिनुसार बदलतात:
साधारणपणे “A” अक्षर असणाऱ्या व्यक्ती लवकर स्वतः होऊन कोणत्या हि गोष्टीत पुढाकार घेत नाहीत. याव्यक्ती दृढ निश्चयी असतात त्यामुळे एखादे लक्ष्य साध्य करण्याचे ठरवले तर त्यासाठी अतिशय मेहनत कष्ट घेतात आणि ते साध्य करूनच राहतात. प्रतिकूल परिस्तिथीत ते सहज स्वतःला जुळवून घेतात.