Breaking News

20 नोव्हेंबर वाढदिवस विशेष : आज ज्या व्यक्तींचा वाढदिवस आहे त्यांचे पुढील वर्षाचे राशिभविष्य

आज तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 20 नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 2 असतो, ज्यांचा स्वामी चंद्रदेव असतो. मूलांक 2 चे जातक खूप भावनिक असते, त्यामुळे काहीवेळा त्यांना याचा फटका सहन करावा लागतो. 

आपण खूप गोड बोलता, आपल्या सोबत बोलून लोकांना आनंद होतो. आपल्या मित्रांची संख्या देखील अधिक असते. आपली मन:स्थिती कधीच सारखी नसते. कधी खूप आनंद असता, तर कधी विनाकारण मन उदास होते.

ह्या राशींच्या व्यक्ती उच्च शिक्षण प्राप्त करतात. ह्या व्यक्ती शारीरिकदृष्ट्या थोड्या कमकुवत असतात पण मानसिकदृष्ट्या खूप मजबूत असतात. आपल्याला एका वेळी अनेक गोष्टी करायच्या असतात. आपण हृदयाने कोमल स्वभावाचे आहे आणि इतरां बद्दल सहानुभूती बाळगता.

या वर्षी नोव्हेंबर महिना व्यावसायिक सहलीसाठी शुभ राहील. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अतिशय अनुकूल राहील. डिसेंबरमध्ये व्यवसायाची बाजू मजबूत होईल. नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. उत्पन्न वाढेल.

जानेवारीमध्ये तुमच्या कार्यशैलीत सुधारणा होईल. ज्यामुळे तुमचे अधिकारी आणि सहकारी तुमची प्रशंसा करतील. पदोन्नती मिळण्याचीही शक्यता आहे.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात वैवाहिक जीवनात पती पत्नी मधील परस्पर अनुकूलता वाढेल. एप्रिलमध्ये आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल. केलेल्या काही गोष्टी चुकीच्या होऊ शकतात. घाईत काम करणे हानिकारक ठरू शकते.

मे महिन्यात नोकरीमध्ये काही महत्त्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात, परंतु तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने सर्व कामे पूर्ण करू शकाल. जूनमध्ये अनावश्यक खर्चाचा त्रास होऊ शकतो. तुमच्या जोडीदारासोबत मित्राच्या लग्नाला उपस्थित राहण्याची संधी मिळेल.

जुलैमधील तुमचा मौल्यवान सल्ला तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचेल. आरोग्याबाबत थोडे जागरूक राहण्याची गरज आहे. ऑगस्टमध्ये व्यावसायिक शत्रू तुमच्यासाठी अनावश्यक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. कोर्ट केसेसपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

सप्टेंबरमध्ये भावांच्या पाठिंब्याने तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय सहज घेऊ शकाल. नवीन काम सुरू करण्यासाठी ऑक्टोबर महिना अतिशय अनुकूल राहील. तुमच्या यशाच्या मार्गात येणारे सर्व अडथळे आपोआप दूर होताना दिसतील.

About Chhaya V

दररोज आम्ही नवीन आणि आपल्या आवडीस येईल अशी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. आपणास जर आमचा हा प्रयत्न आवडला तर आम्हाला फेसबुक वर फॉलो करा.