Breaking News

चंद्र अस्त झाल्याने कर्क राशीच्या लोकांचा आत्मविश्वास कमी होतो, जाणून घ्या कोणत्या राशीवर काय होईल परिणाम

सूर्य ग्रहांचा राजा, तो एखादया अग्नी सारखा आहे. त्यांची उष्णता खूप भयंकर आहे. प्रत्येक ग्रह त्याच्या सहनशीलते नुसार सूर्यापासून ठराविक अंतरावर पोहोचतो आणि मावळतो, सूर्याच्या उष्णतेसमोर आणि तेजस्वीतेसमोर ग्रह स्वतःची चमक गमावतो. तो आकाशात दिसत नाही. या स्थितीला ग्रहाचा अस्त असे म्हणतात.

सर्व ग्रह सूर्य समोर अस्त होतात. राहू आणि केतू हे छाया ग्रह आहे त्यामुळे ते कधीही अस्त होत नाहीत. ग्रह नियमितपणे अस्त झाल्यास त्याचा राशीवर काय परिणाम होईल हे आपण सविस्तरपणे समजून घेऊ. आज आपण चंद्राच्या अस्ताच्या परिणामावर चर्चा करत आहोत.

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा चंद्र सूर्यापासून 12 अंशांवर येतो तेव्हा तो अस्त अवस्थेत असतो असे मानले जाते. जेव्हा एखादा ग्रह अस्त होतो तेव्हा त्याचे मुख्य घटक कमी होतात आणि ते सूर्याच्या स्थितीनुसार परिणाम देऊ लागतात. प्रत्येक ग्रह प्रत्येकासाठी काही विशिष्ट घटकांमुळे खूप महत्वाचा असतो, म्हणून अस्त ग्रह मजबूत केला पाहिजे जेणेकरून तो त्याचे नैसर्गिक परिणाम देऊ शकेल.

मेष : राशीच्या लोकांसाठी चंद्र सुखाचा कारक आहे. चंद्रास्त होताच समाधानाची भावना कमी होईल. सर्वकाही असूनही, आनंद घेण्याची त्याची प्रवृत्ती कमी असेल. मानसिकदृष्ट्या कठीण परिस्थितीत मन लवकर अस्वस्थ होईल. वाहन आणि इमारतीच्या आनंदातही घट आहे. याशिवाय आईच्या आनंदातही घट होते.

वृषभ : या राशीच्या लोकांसाठी चंद्र मावळताच त्यांची प्रतिभा कमी होते. लहान भावंडांच्या आनंदात कमतरता राहते. वडिलोपार्जित गुणांची प्राप्ती कमी होते. जिकडे शौर्य दिसावे तिकडे धैर्य कमी होते. व्यक्ती फारशी कलात्मक नसते.

मिथुन : संयुक्त कुटुंबात राहण्यात समस्या होते किंवा संयुक्त कुटुंबात सुख नाही मिळत. हवे तेवढे कमवा पण बँकेत पैसे राहत नाही. बचतीच्या बाबतीत कमकुवत. प्राथमिक शिक्षणातही अडचणी येतात.

कर्क : यामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होते. आत्मविश्वास कमकुवत होतो. वडिलांच्या संरक्षणाची पावला पावला वर आवश्यकता भासते. त्यांना त्यांचा मुद्दा फार प्रभावीपणे मांडता येत नाही. छोट्या छोट्या गोष्टींवरून ते नाराज होतात.

सिंह : या राशीत चंद्र मावळताच खर्चाची यादी मोठी होते. वाहन काळजीपूर्वक चालवले नाही, तर त्यांचे अपघात व्हायला वेळ लागत नाही. वादांपासून दूर राहावे कारण वाढते प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ शकते, कुंडलीतील इतर ग्रहांचे सहकार्य न मिळाल्यास लॉकअपची हवा खावी लागू शकते.

कन्या : या राशीत चंद्र अस्त होताच त्यांची कमाईही नष्ट होते. कष्ट करा पण पगार कमी. पगार वाढवण्यासाठी बॉसला सतत विनंती करा पण तरीही समाधानकारक परिणाम मिळत नाहीत. मोठ्या भावा बहिणीचा आनंद फारसा नसतो.

तूळ : काम करायला कमी मन लागेल. ते फार कष्टाळू होऊ शकत नाहीत, त्यांना माहित आहे की खूप कष्ट करावे लागतील पण तरीही ते करू शकत नाहीत. कधी कधी त्यांच्या डोळ्यांसमोरून संधी निघून जातात. यश मिळवण्यात कमी पडतात.

वृश्चिक : कठोर परिश्रमाचे फळ मिळत नसेल तर नशीब खराब होते असे म्हटले जाते, त्याचप्रमाणे चंद्र अस्त झाल्याने जितके बळ नशिबाला मिळते तेवढे मिळू शकत नाही. धार्मिक कार्यात रस ही कमी होतो.

धनु : यामध्ये चंद्राच्या अस्ताचा कोणताही वाईट प्रभाव नाही. यामध्ये मन थोडे कमजोर असेल पण आरोग्य चांगले राहील. सासरच्या मंडळीं कडून फारसा पाठिंबा मिळत नाही.

मकर : जीवनसाथी सोबतच्या नात्यात काही कमतरता राहते. भागीदारीचाही अभाव राहतो. मित्रांसोबत दीर्घ मैत्री टिकत नाही. नवीन मित्र बनत राहतात.

कुंभ : स्पर्धेत विजय प्राप्त होईल. कुंभ राशीच्या लोकांसाठी चंद्राचा अस्त फार वाईट परिणाम देत नाही. थंडीमुळे समस्या निर्माण होतात. थंड पदार्थ लवकर नुकसान करतात. कर्जामुळे तणाव असू शकतो किंवा कर्ज न मिळाल्याने त्रास होऊ शकतो.

मीन : मानसिक बळ थोडे कमी होईल. विद्यार्थ्यांना विषय लगेच समजण्यात काही अडचण येते, पण एकदा समजला की पुन्हा अडचण येत नाही. गरोदरपणात महिलांना त्रास होतो.

About Chhaya V

दररोज आम्ही नवीन आणि आपल्या आवडीस येईल अशी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. आपणास जर आमचा हा प्रयत्न आवडला तर आम्हाला फेसबुक वर फॉलो करा.